उरण : वार्ताहर
उरण तालुक्यातील पुर्वविभागात कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात कोवॅक्सीन लसीकरणाला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी (दि. 12) प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी या लसीकरणाला सुरुवात झाली असून लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
यासाठी आशा सेविका यांनी विशेष मेहनत घेतली आहे. यासाठी गावात जनजागृतीद्वारे या लसीकरणाची माहिती देण्यात आली. त्यामुळे परिसरातून चांगला प्रतिसाद मिळण्याची आशा व्यक्त करण्यात आली.
प्रथम कोप्रोली गावातील जेष्ठ नागरिक विष्णू म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी यांनी सपत्निक कोवॅक्सीन लस टोचून घेतली आहे. तसेच गावातील दूसरे व्यक्ती म्हणजे नारायण कोळी यांनी सुद्धा लसीकरणाला हजेरी लावून लस टोचून घेतली. लसीकरणासाठी आठवड्यातून तीन दिवस सोमवार, बुधवार, आणि शुक्रवार निच्छित करण्यात आले तर सकाळी 10.30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत लसीकरण होणार आहे, अशी माहिती आरोग्य केंद्रामार्फत देण्यात आली.
या वेळी उरण तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र इटकरे, कोप्रोंली प्राथमिक आरोग्य केंद्रातून डॉ. राजाराम भोसले, डॉ. चोरमोळे, प्रा. राजेंद्र मढवी, स्वप्निल पाटील आरोग्य कर्मचारी आदी उपस्थित होते.