Breaking News

न्हावे गावासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार -लोकनेते रामशेठ ठाकूर

स्वखर्चातून केलेल्या विविध विकासकामांचा शुभारंभ

पनवेल ः रामप्रहर वृत्त
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या खर्चातून 40 लाख रुपयांचा निधी वापरून न्हावे गावात जलकुंभ, महिला मंडळाचे कार्यालय आणि व्यायाम शाळेचे नूतनीकरण करण्यात आले. या कामांचा शुभारंभ मंगळवारी (दि. 25) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाला. या वेळी त्यांनी न्हावे गाव ही माझी कर्मभूमी असून गावासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार, असे आश्वासन त्यांनी दिले.
पनवेल तालुक्यातील न्हावे गावातील नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावत होती. याबाबत गावातील महिलांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली होती. त्यांच्या समस्येची दखल घेऊन 30 लाख रुपयांची मदत केली होती. या निधीमधून न्हावे गावात जलकुंभ बांधण्यात आला आहे. या जलकुंभाची एक लाख 10 लिटरची क्षमता असून या जलकुंभाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. जलकुंभ उभारण्याकरीता नंदकिशोर भोईर आणि नितीन भोईर यांनी जागा दिली असून त्यांचा या वेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दरम्यान न्हावे गावातील वनिता महिला मंडळाच्या कार्यालयाचे तसेच व्यायामशाळेचे नूतनीकरणही करण्यात करण्यात आले आहे. यासाठीही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी 10 लाख रुपयांची मदत केली.
या विकासकामांच्या शुभारंभा वेळी भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत, माजी सरपंच चंद्रकांत भोईर, सरपंच हरेश्वर म्हात्रे, उपसरपंच प्रल्हाद पाटील, ग्रामपंचायत सदस्य सागरशेठ ठाकूर, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, सदस्या योगीता भगत, भाजप वाहतूक सेलचे हेमंत ठाकूर, सी. एल. ठाकूर, मनिषा पाटील, गव्हाणच्या माजी सदस्य स्नेहलता ठाकूर, जयवंत देशमुख, किशोर पाटील, सुहास भगत, प्रमोद कोळी, गाव अध्यक्ष तुषार भोईर, ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र भोईर, विजया ठाकूर, महिला मंडळाच्या अध्यक्षा मिनाक्षी पाटील, मंजुषा ठाकूर, माजी अध्यक्ष किशोर घरत, संजय ठाकूर, चंद्रकांत पाटील, रंजना घरत, कमलाबाई म्हात्रे, सुशीला पाटील, राकेश पाटील, राजेश म्हात्रे, नवनाथ म्हात्रे, भुषण भोईर, आर. ए. म्हात्रे, बाळुशेठ भोईर, किशोर भोईर, गायकवाड गुरुजी, प्रकाश कडू, राजेश घरत, उत्त्म म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गावातील विकास कामांसाठी 40 लाख रुपयांची मदत केल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply