Breaking News

चिंचवण ब्रिजवर एसटीची खासगी बसला जोरदार धडक; चार जण जखमी

पनवेल : वार्ताहर
पनवेल तालुक्यातील चिंचवण ब्रिजच्या वरती गुरुवारी (दि. 29) सकाळी एसटी बस आणि खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. पनवेल-पेण एसटी बस निसरड्या रस्त्यामुळे डिव्हायर ओलांडून पलिकडे गेली. याचवेळी समोरून येणार्‍या जेएसडब्ल्यू स्टील कंपनीच्या बसला एसटी बस जाऊन आदळली. यामध्ये चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
पावसाळा नुकताच सुरू झालेला आहे. यामुळे रस्त्यावरील माती, टायर घासून निर्माण झालेली धूळ यामुळे वाहने चालविताना वेगात असल्यास घसरण्याचे प्रकार घडत असतात. मुंबई गोवा महामार्गावर पनवेलहुन पेणकडे जाणारी एसटी बस (एमएच 20 बीएल 3067) ने चिंचवण ब्रिजवर निसरड्या रस्त्यामुळे डिव्हायर ओलांडून थेट पलिकडे गेली. याचवेळी समोरून येत असलेल्या जेएसडब्ल्यू स्टील कंपनीची बसला (एमएच 46 बीयु 1832) तिची धडक बसली. यामध्ये एसटी चालक मनोज चव्हाण, प्रवासी चांगुणाबाई म्हात्रे, विठाबाई कोळी तर जेएसडब्ल्यू बसचालक संजय म्हात्रे जखमी झाले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांच्यासह पनवेल शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी, पळस्पे वाहतूक शाखेचे अधिकारी, अग्निशमन दल तसेच एसटी महामंडळाचे अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
जखमी प्रवाशांना तत्काळ कामोठे एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघातात एसटी बस आणि जेएस डब्ल्यू बसचे मोठे नुकसान झाले आहे. सदर घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनेमुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. त्यांनतर पोलिसांनी क्रेन बोलावून घेऊन अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

Check Also

संकट काळात ठाकूर कुटुंबियांनी केलेली मदत जनता विसरणार नाही -जरीना शेख

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या संकट काळात लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांतदादा ठाकूर, परेशदादा ठाकूर …

Leave a Reply