Breaking News

पनवेलमधील पर्यटनस्थळांवर वर्षासहलींसाठी मनाई

पनवेल : वार्ताहर
पावसाळ्यामध्ये धबधबे, धरण पर्यटन प्रेमींना खुणावत आहेत, वीकेंडला अनेक जण सहकुटुंब किंवा मित्र मंडळींसोबत वर्षासहलीचे बेत आखतात, मात्र पनवेलमधील करंबेळी, कोंडले, मोर्बे येथे पर्यटकांनी जाऊन जीवितहानी होऊ नये म्हणून पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी येणार्‍या पर्यटकांसाठी सुरक्षेचे अनुषंगाने सुचना, मनाई आदेश याचे सुचना फलक लावले आहेत.
सततच्या कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने पनवेल तालुक्यातील नदी, नाले, तलाव, धरणे, बंधारे, ओसंडून वाहत आहेत. सर्व डोंगर, माळरान, शेती हिरवीगार झाली आहे. वर्षासहलीसाठी जाणार्यांना ही स्थळे भुरळ घालत आहेत. निसर्गाच्या सानिध्यात येण्यासाठी येथील वातावरण साद घालीत आहे. त्यामुळे निसर्गप्रेमी या पर्यटन स्थळांवर जाण्यासाठी आनंदित असतात. साप्ताहिक सुटीच्या दिवशी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, पनवेल येथील पर्यटक प्रचंड गर्दी करीत असतात.
काही जण पोलिसांची नजर चुकवून येथील धबधबे, नाले यात उतरत असतात, पण त्यांना पाण्याचा अंदाज मिळत नसल्याने जीवितहानी होते. असे कोणतेही प्रकार घडू नयेत म्हणून पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी येणार्‍या पर्यटकांसाठी सुरक्षेचे अनुषंगाने सुचना, मनाई आदेश याचे सुचना फलक लावले आहेत. तसेच पोलिसांचे सूचना तसेच आदेश पाळण्याचे आवाहन पर्यटकांना केले आहेत.

आदेश झुगारून पर्यटक पांडवकडा धबधब्यावर
पांडवकडा धबधब्यावर होणार्‍या दुर्घटना टाळण्यासाठी खारघर पोलिसांनी धबधबा परिसरात जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत, मात्र ही बंदी झुगारून दररोज शेकडो पर्यटक मनसोक्त भिजण्याचा आनंद घेत आहेत. त्यामुळे कागदावरील बंदी आदेशांची अंमलबजावणी प्रत्यक्षात होत नसल्याने दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पांडवकडा धबधब्यावर गेल्या दहा वर्षांत अनेक तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे. हे टाळण्यासाठी खारघर पोलीस तसेच पनवेल वन विभागाकडून धबधबा परिसरात प्रवेश बंदी केली जाते. तसेच नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे फलकही लावण्यात आले आहेत, मात्र असे असताना अनेक पर्यटक बंदी झुगारून पांडवकडा धबधब्यावर भिजण्याचा मनसोक्त आनंद घेत आहेत.

Check Also

मुंबईजवळ समुद्रात बोट बुडून 13 जणांचा मृत्यू; 101 जणांना वाचवले

मुंबई : प्रतिनिधी मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी (दि.18) सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. …

Leave a Reply