Breaking News

लाच स्वीकारताना महिला तलाठीला रंगेहाथ पकडले

अलिबाग : प्रतिनिधी
वडीलोपार्जित मिळकतीच्या सातबारा उतार्‍यावर वडिलांच्या मृत्यूनंतर कायदेशीर वारस म्हणून नोंद करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना अलिबाग तालुक्यातील बामणोलीच्या महिला तलाठीला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. पल्लवी यशवंत भोईर (वय 39) लाचखोर तलाठीचे नाव आहे. रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.
पल्लवी यशवंत भोईर यांची खंडाळा तलाठी म्हणून मूळ नेमणूक आहे. त्यांच्याकडे बामणोलीचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. 4 जुलै रोजी लोणारे येथील तक्रारदार यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यामुळे लोणारे तालुका अलिबाग येथील ग.नं. 40/1, क्षेत्र 0-57-0 या वडिलोपार्जित मिळकतीच्या सातबारा उतार्‍यावर कायदेशीर वारस म्हणून नोंद करण्यासाठी त्यांनी तलाठी सजा कार्यालयात अर्ज केला होता. या कामासाठी तलाठी पल्लवी भोईर यांनी तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यामुळे तक्रारदारांनी याबाबत रायगडच्या अलिबाग येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार केली. या तक्रारीची खात्री करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तलाठी पल्लवी भोईर यांच्यावर पाळत ठेवून सापळा रचला. त्यानुसार मंगळवारी तक्रारदाराकडून तलाठी भोईर हिने पाच हजार लाच स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने भोईर हिला जेरबंद केले.
पोलीस निरीक्षक नवनाथ चौधरी, हवालदार महेश पाटील, शिपाई सचिन आटपाडकर, नाइक स्वप्नाली पाटील यांनी ही कारवाई केली.

Check Also

रायगड क्रिकेट असोसिएशनला सर्वतोपरी मदत करणार -आशिष शेलार

अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन (आरडीसीए)ला सर्वतोपरी मदत करणार, असे आश्वासन भारतीय क्रिकेट …

Leave a Reply