Sunday , February 5 2023
Breaking News

भारत किंवा इंग्लंड संघ वर्ल्ड कप जिंकणार : मॅकग्रा

चेन्नई : वृत्तसंस्था

आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि इंग्लंड हे विजेतेपद जिंकू शकतील. गोलंदाजांच्या कामगिरीच्या बळावर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला जेतेपदावर नाव कोरता येईल, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राने व्यक्त केले आहे. भारताविरुद्ध नुकत्याच झालेल्या मालिकेत विजय मिळवून ऑस्ट्रेलियाने विश्वचषकातील विजेतेपदाच्या आशा उंचावल्या आहेत, असेही मॅकग्राने सांगितले.

49 वर्षीय मॅकग्राने सांगितले की, इंग्लंड आणि भारत हे विश्वचषकातील दोन सर्वोत्तम संघ आहेत. वेस्ट इंडिजमध्ये इंग्लंडला झगडायला लागले; तर भारताने ऑस्ट्रेलियाकडून हार पत्करली. त्यामुळे या दोन संघांमधील रंगत अधिक वाढेल.

‘इशांत शर्मा हा अतिशय अनुभवी गोलंदाज आहे. अनुभवी भुवनेश्वर कुमारनेही अप्रतिम गोलंदाजी करायला हवी. मोहम्मद शमी सध्या सातत्याने बळी मिळवत आहे. जसप्रीत बुमराकडे असामान्य गुणवत्ता असून, यॉर्कर्स आणि रिव्हर्स स्विंग करण्याची क्षमताही आहे. त्यामुळे भारताला विश्वविजेतेपदासाठी गोलंदाजांनी कामगिरी उंचावण्याची आवश्यकता आहे,’ असेही मॅकग्रा म्हणाला.

Check Also

कामोठ्यातील लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे स्नेहसंमेलन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल …

Leave a Reply