कामोठे ढेकू, कार्यकर्त्यांचा प्रवेश; आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून स्वागत
पनवेल ः रामप्रहर वृत्त
भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात विकासकामांचा धडाका सुरू असल्याने या विकासाला भारावून कामोठे व खालापूर तालुक्यातील ढेकू येथील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रवेशकर्त्या सर्व कार्यकर्त्यांचे भाजपची देऊन पक्षात स्वागत केले.
कामोठे शहरातील छाबा फाउंडेशन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष दामोदर बाजीराव चव्हाण यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी तसेच इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल एज्युकेशनचे डायरेक्टर मनोहर शिंगाडे, संध्या शुक्ला, नीलू बडीता, प्रजापती उपाध्याय यांनी शनिवारी (दि. 8) भाजपमध्ये पक्षप्रवेश केला.
या वेळी भाजपचे कामोठे शहराध्यक्ष रवींद्र जोशी, माजी नगरसेवक डॉ. अरुण कुमार भगत, गोपीनाथ भगत, माजी नगरसेविका कुसुम म्हात्रे, पुष्पा कुत्तरवडे, भाऊ भगत, रवी गोवारी, हॅपी सिंग, महामंत्री सुशील शर्मा, युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, भटके विमुक्त आघाडी महिलाध्यक्ष विद्या तामखेडे, जय पावनेकर, विनोद खेडकर, रश्मी भारद्वाज, मनीषा वनवे, तेजस जाधव, सागर ठाकरे, विकी टेकवडे आदी उपस्थित होते. हा पक्षप्रवेश युवा मोर्चाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील आणि महामंत्री सुशील शर्मा यांच्या माध्यमातून झाला.
त्याचप्रमाणे खालापूर तालुक्यातील ढेकू येथील युवा नेते मयूर पाटील, प्रतीक लाले, मनीष पाटील, अक्षय खरीवले, बाबू पाटील, प्रतीक कदम, सागर पाटील, किरण शिताप, राज सावंत, अनुराग घाडगे, मयूर पाठारे, भावेष पवार, ऋतिक ठाकूर, प्रशांत पाटील आदींनी भाजपमध्ये प्रवेश केला.
या प्रवेशासाठी युवा नेते प्रसाद पाटील, जिल्हा कोषाध्यक्ष सनी यादव यांनी विशेष प्रयत्न केले. या वेळी रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी, या तरुण कार्यकर्त्यांना आगामी काळात लागेल ते सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले. देश आज पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली विकासाची नवनवीन उंची गाठत आहे. त्यामुळे तरुणांचा कल हा भाजपकडे जास्त आहे. ढेकू गावातील या तरुणांच्या प्रवेशामुळे आगामी काळात साजगाव पंचायत समिती विभागात भाजपची ताकद वाढली असून आगामी काळात या विभागात आणखी प्रवेश होणार आहेत, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
या प्रवेशाच्या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल मोरे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष नागेश पाटील, कामगार आघाडी तालुकाध्यक्ष रवींद्र पाटील, तालुका उपाध्यक्ष हेमंत पाटील, जिल्हा परिषद विभाग अध्यक्ष भरत महाडिक उपस्थित होते.