खारघर : प्रतिनिधी
खारघर शहर हे नवी मुंबई मधील निसर्ग विविधतेने नटलेले अस शहर आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगा, विस्तीर्ण खाडीकिनारा लाभलेल्या या शहरात झपाट्याने विकास होत आहे, मात्र नैसर्गिक विविधतेने नटलेल्या या शहराचा आणखी एक रूप एका निसर्गप्रेमी छायाचित्रकाराने समोर आणला आहे. मागील तीन वर्षांपासुन केलेल्या छायाचित्रणात खारघरमध्ये 48 जमातीचे वेगवेगळे फुलपाखरू छायाचित्रकार सारंग तरीन यांनी आपल्या कॅमेर्यात कैद केले आहेत.
या 48 फुलपाखरूंपैकी चार जमाती या दुर्मीळ असल्याचे सारंग ने पुढे केलेल्या संशोधनात समोर आले आहे. या दुर्मीळ जमातीमध्ये सह्रयाद्री प्लेन पफीन व सह्याद्री ब्लु ओकली या केवळ महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वतरंगामध्ये आढळणार्या फुलपाखरांच्या जमाती आहेत. उर्वरित दोन ग्राम ब्लु व ड्यानियड एक्सले या दोन जमाती देशभरात विविध ठिकाणी आढळलत असतात या चार पुलाखारांच्या प्रजातींना 1972 च्या वन्य जीव संरक्षण कायद्यानुसार या चारही प्रजातींना संरक्षण प्राप्त आहे. सारीन यांनी टिपलेले हे छायाचित्र खारघर हिल (पर्वतरांगा), खारघर खाडी किनारे, तसेच शहरातील मैदानी ठिकाणावरील आहेत यामध्ये सेंट्रल पार्क,वेटलँड परिसरातील आहेत. विशेष म्हणजे शहरातील अंतर्गत मैदाने, उद्याने याठिकाणीदेखील फुलपाखरू आढळत आहेत.
खारघर शहराचा झपाट्याने विकास होत चालल्याने मोठ्या प्रमाणात याठिकाणचा निसर्ग नष्ट होत चालला असल्याची खंत निसर्गमित्र छायाचित्रकार सारंग तारीन यांनी व्यक्त केली आहे.वनविभागाने याबाबत गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत तारीन यांनी व्यक्त केली आहे.
खारघरमध्ये आढळलेल्या 48 प्रजातींचे छायाचित्र सारंग तारीन यांनी https://www.ifoundbutterflies.org/ या संकेतस्थळावर अपलोड केले आहेत. देशभरातीत दुर्मीळ, अतिदुर्मीळ फुलपाखरूचे छायाचित्र या संकेतस्थळावर पहावयास मिळतात.