Breaking News

घरफोडीत तीन लाखांचा माल चोरी

तळोजा वसाहतीमधील घटना
पनवेल : वार्ताहर
गावी गेलेल्या कुटुंबातील घरी कोणी नसल्याचे पाहून घरातील कडी-कोयंडा तोडून घरातील कपाटात असलेले रोख रक्कम व दागिने असा एकूण तीन लाख रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना तळोजा वसाहतीत घडली आहे. याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे.
तळोजे फेज 1 येथील ऑरेंज आर्केड इमारतीत राहणारे रश्मीन शराफत अली सुर्वे हे कुटुंबासह मुळ गावी गेले होते. यादरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे घराचा कडी कोयंडा तोडुन घरात प्रवेश करुन 30 हजार रुपये रोख रक्कम, 40 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे ब्रेस्लेट, 60 हजार रुपये किमतीचे सोन्याची चैन, 80 हजार रुपये किंमतीचे अंदाजे 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील सात एअर रिंग व झुमके, एक लाख रुपये किंमतीचे पाच अंगठया असा एकुण तीन लाख 10 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला.
याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिरसाठ करीत आहेत.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांना मुंबई मराठी पत्रकार संघाचे विशेष सन्माननीय सदस्यत्व प्रदान

पनवेल : प्रतिनिधी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त संघाच्या पत्रकार भवनातील सभागृहात शुक्रवारी (दि.21) …

Leave a Reply