Breaking News

डी-मार्ट बंदमुळे नागरिकांमध्ये समाधान

कर्जत भाजपच्या प्रयत्नांना यश

कडाव : प्रतिनिधी – रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याने  नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतीय जनता पक्ष कर्जत शहर युवा मोर्च्याच्या वतीने डी-मार्ट सुपर मार्केट तीन दिवसांसाठी बंद करण्यात यावे असे निवेदन नुकतेच देण्यात आले होते तसेच किरवली ग्रामपंचायतीनेही अशी मागणी केली होते. भाजपच्या व किरवली ग्रामपंचायतीच्या मागणीला यश आले असून, डी-मार्ट बंद ठेवण्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

 भाजपचे उत्तर रायगड जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष किरण ठाकरे, कर्जत तालुकाध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चा कर्जत शहराध्यक्ष मयुरेश शितोळे, उपाध्यक्ष रोहित बाफना, सचिव विजय पाटील यांच्या शिष्टमंडळाने 29 जून रोजी डी-मार्ट व्यवस्थापनाची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. कर्जत शहर व परिसरातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नागरिकांची गर्दी होणारे डी-मार्ट बंद ठेवून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार कर्जत बंदमध्ये डी-मार्ट व्यवस्थापनाने सहकार्याची

भूमिका घेत तीन दिवसांसाठी बंद पाळला आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कर्जत व्यापारी संघटनेने तीन दिवसांसाठी शहर बंद केले आले. त्याचप्रमाणे डी-मार्टमधील ग्राहकांची दैनंदिन वाढती संख्या पाहता व्यवस्थापनाबरोबर झालेल्या चर्चेत डी-मार्ट बंद करण्याचा व्यवस्थापनाने घेतलेला निर्णय योग्य आहे.

-रमेश मुंढे, चिटणीस, भाजप उत्तर रायगड जिल्हा

Check Also

झालमुरी, एसडी, आरडी आणि सुरांची अवीट मैफल!

‌‘पुरवैय्या‌’ने पनवेलकरांना दिली अविस्मरणीय सांगीतिक पर्वणी पनवेल : रामप्रहर वृत्तपश्चिम बंगालने हिंदी चित्रपटसृष्टीला अनिल विश्वास, …

Leave a Reply