Breaking News

कळंबोलीत एकाला सव्वा तीन लाखांचा गंडा

पनवेल : वार्ताहर
प्रीपेड टास्क खेळावयास सांगून भरलेल्या रकमेचा अधिक परतावा देण्याचे आमिष दाखवून तीन लाख 37 हजार 40 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार कळंबोली येथे घडला आहे.
सेक्टर 11 कळंबोली येथील प्रशांत गडवीर यांना ऑनलाइन वर्क फ्रॉम होम करणार का, याबाबत विचारणा करण्यात आली. यावेळी लिंक पाठवल्यानंतर त्यांनी काम करण्याचा विचार केला. त्यांना टेलिग्रामवर जॉइन व्हायला सांगितले. या वेळी एक लाइक केल्यानंतर त्यांच्याकडून प्रत्येक टास्क मागे दीडशे रुपये खात्यावर जमा होणार असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांना बँकेचे खाते क्रमांक देण्यात आले. ते आठ ते दहा टास्क खेळले.
या वेळी 650 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा झाले, त्यानंतर दुसरी लिंक पाठवून 30 टास्क खेळले. नवीन व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करून काही रक्कम भरल्यानंतर तीस ते चाळीस टक्के अधिक करून पुन्हा रक्कम तुमच्या खात्यावर जमा करणार असल्याचे सांगितले. खात्यावर पुन्हा पैसे पाठवण्यात आले. पैसे जमा होत असल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला. त्यानंतर टास्क खेळल्याशिवाय गुंतवलेल्या रकमेचा परतावा मिळणार नसल्याचे सांगून त्यांनी पुढील टास्क खेळायला लावला. असे करता करता त्यांनी तीन लाख 37 हजार 40 रुपये यात भरले, मात्र ही रक्कम परत न देता फसवणूक केली गेली असे त्यांच्या आल्यावर त्यांनी लक्षात कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply