Breaking News

पनवेल महापालिका पुरवणार घरपोच धान्य, भाजीपाला, फळे

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील गृहनिर्माण संस्थांमधील रहिवाशांना आता थेट घरपोच धान्य, भाजीपाला आणि फळे मिळणार आहे. रहिवाशांनी मागणी नोंद केल्यास त्यांना थेट शेतकरी विक्री योजनेमार्फत उपलब्धतेप्रमाणे भाजीपाला, फळे व धान्य घरपोच पुरविण्यात येणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी गृहनिर्माण संस्थांमधील सभासदांनी घराबाहेर न पडता सर्वांना रास्त दरात भाजीपाला, फळे, धान्य आदी मिळावे यासाठी पनवेल महापालिका प्रयत्न करीत आहे. याचा लाभ घेण्यासाठी सोसायटीचे चेअरमन किंवा सचिव यांनी आपली मागणी महापालिकेच्या मोबाईल अ‍ॅपवर नोंदविणे आवश्यक आहे. प्रत्येक सोसायटीने नोंदणी केल्यावर त्यांना विशिष्ट नोंदणी क्रमांक दिला जाईल. त्याचा वापर करून सभासद मागणी नोंदवू शकतील. या उपक्रमाचा पनवेल महापालिका हद्दीतील सर्व सोसायट्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply