मोखाडा : प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेच्या पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात प्रशासकीय इमारत, बोअरवेल जलपूजन आणि बायोफ्लॉक प्लांट शेड उभारण्यात येणार आहे. या कामांचे भूमिपूजन ‘रयत’चे व्हाईस चेअरमन अॅड. भगीरथ शिंदे आणि मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी (दि. 2) झाले.
या कार्यक्रमास आमदार सुनील भुसारा, नगराध्यक्ष अमोल पाटील, जि. प. सदस्य प्रकाश निकम, प्राचार्य डॉ. एल. डी. भोर, प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, माजी प्राचार्य डॉ. पी. जी. पवार, डॉ. एन. आर. मढवी, शामकांत चुभळे, एल. डी. काटे, संतोष जाधव, संतोष चौथे यांच्यासह पदाधिकारी, प्राध्यापक आदी उपस्थित होते.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …