Friday , September 29 2023
Breaking News

भाजप ओबीसी मोर्चाचा पनवेलमध्ये मेळावा

प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांनी केले मार्गदर्शन

पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजप उत्तर रायगड जिल्हा ओबीसी मेळावा गुरुवारी (दि. 10) पनवेल येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या वेळी ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांनी मार्गदर्शन केेले.
या वेळी प्रदेशाध्यक्ष संजय गाते म्हणाले की, पक्षाकडून आपल्याला जी जी जबाबदारी दिली जाईल ती चोख बजावण्यासाठी आपण कटिबद्ध झाले पाहिजे, तेव्हा ओबीसी मोर्चा 2024च्या निवडणुकीत सिंहाचा वाटा उचलू शकतो.
या मेळाव्याला भाजपचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. मनोज भुजबळ, हरिश्चंद्र भोईर, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, सरचिटणीस दशरथ म्हात्रे, भाजप जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, महिला जिल्हा अध्यक्ष तथा माजी उपमहापौर सीताताई पाटील, युवक अध्यक्ष प्रसाद म्हात्रे, दशरथ बेहेल, पनवेल ग्रामीण अध्यक्ष अप्पा भागीत, पनवेल शहर अध्यक्ष रामनाथ पाटील, कामोठे मंडल अध्यक्ष भाऊ भगत, कळंबोली अध्यक्ष जनार्दन पाटील, उरण अध्यक्ष दीपक पाटील, महिला पनवेल शहर अध्यक्ष अ‍ॅड. वृषाली वाघमारे, भारद्वाज चौधरी, हेमंत भास्कर, सोशल मीडिया पनवेल शहर संजोयक प्रसाद हनुमंते यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
देशाच्या इतिहासामध्ये ओबीसीच्या संदर्भात आरक्षण मिळण्यापासून ते स्वतंत्र मंत्रालय होण्यापर्यंतचे सर्व निर्णय हे भारतीय जनसंघ आणि भाजपच्या काळात झाले असल्याचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांनी म्हटले.

Check Also

पनवेलमधील रोजगार मेळाव्यात उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान

केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये …

Leave a Reply