अलिबाग : प्रतिनिधी
डिझेलची तस्करी करणार्यांचा रायगड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. रेवस पकटी येथे टाकलेल्या छाप्यात बोटीसह एक कोटीहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस महानिरीक्षक कोकण परीक्षेत्र, नवी मुंबई तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना मांडव्याजवळ समुद्रात बोटीतून डिझेलची वाहतूक व साठा होत असल्याची माहिती मिळाली होती. घार्गे व अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनी पोलीस ठाण्याचे निरीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीनुसार रेवस पकटीजवळील खाडीमध्ये उभ्या करून ठेवलेल्या बोटींवर जाऊन कारवाई केली.
या वेळी कन्हैया साई नावाच्या बोटीमध्ये हिरव्या रंगाचे एकूण 18 हजार लिटर डिझेल, तर गजलक्ष्मी माता नावाच्या बोटीत 28 हजार लिटर हिरव्या रंगाचे डिझेल आढळले. पोलिसांनी दोन्ही बोटी व डिझेल मिळून एक कोटी तीन लाख 24 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या बोटींवरील जियाउल्लख असरावली शेख (वय 35, रा. दिवाळे गाव, नवी मुंबई), दर्शन रमेश नाखवा (वय 40, रा. बोडणी, ता. अलिबाग), कमल बद्रीप्रसाद बर्मन (वय 34, रा. हाशिवरे, ता. अलिबाग), राजू कारू महातो (वय 41, रा. खरकी, झारखंड), निसर्ग गणेश नाखवा (वय 31, रा. बोडणी, ता. अलिबाग) निकेश गणेश नाखवा (वय 25. बोडणी, ता. अलिबाग), पुनित डहरू उरा (वय 29, रा. हुटरी, झारखंड), बिनेय जठल गुरी (वय 32, रा. जमनी जरा, झारखंड), प्रेम खेमन महातो (वय 43, रा. नारायणपूर, झारखंड) अशा नऊ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Check Also
सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक
प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …