मुंबई : प्रतिनिधी
रिझर्व्ह बँकेकडील (आरबीआय) सुवर्णसाठा आता विक्रीला काढण्यात आला असून, बँकेने जुलैपासून बाजारात 1.15 अब्ज डॉलर सोनेविक्री केली आहे, असे वृत्त माध्यमांमध्ये पसरले होते, मात्र आरबीआयने हे वृत्त फेटाळून लावले आहे. आम्ही सोन्याची विक्री किंवा कोणताही व्यापार केलेला नाही, असे स्पष्टीकरण बँकेने दिले आहे.
रिझर्व्ह बँकेने तीन दशकांनंतर पहिल्यांदाच सोन्याची विक्री केली आहे, तसेच जालान समितीच्या शिफारशी स्वीकारल्यानंतर या वर्षी ऑगस्टपासून सोन्याच्या व्यापारात सक्रिय झाल्याचे वृत्त माध्यमांमध्ये पसरले होते. त्याबाबत रिझर्व्ह बँकेने रविवारी (दि. 27) ट्विटद्वारे स्पष्टीकरण दिले. या केवळ अफवा आहेत, असे बँकेने म्हटले आहे.