Breaking News

ज्येष्ठांच्या सर्व उपक्रमांना सहकार्य -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त
ज्येष्ठ नागरिकांना एकत्र येऊन वेळेचा सदुपयोग करता यावा, गप्पा मारता याव्यात, विचार विनिमय करता यावा यासाठी उपयुक्त ठरेल असे निवारा असणारे विरंगुळा केंद्र उभारल्याचे समाधान माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केले.
उलवे नोड येथील सेक्टर 17मधील बिकानेर चौकामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या विरंगुळा केंद्राचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी उद्घाटनपर भाषणात पुढे बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी ज्येष्ठांच्या सर्व उपक्रमांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
या उद्घाटन सोहळ्यास गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, महिला मोर्चाच्या अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य योगिता भगत, वहाळ ग्रामपंचायत उपसरपंच अमर म्हात्रे, सुधीर ठाकूर, उत्तर भारतीय संघाचे अध्यक्ष अवधेश महतो, आशीष, माजी पोलीस इन्स्पेक्टर देशमुख तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक सदस्य बबनराव चौरे, कार्यकारी अध्यक्ष प्रा. राम देवरे, प्रदीप गायकवाड, सुरेश देवळेकर, केशव काळपुंड, तात्यासाहेब कोडग, रवी धस, मोहनराव गाडे पाटील, गोरखनाथ कांबळे, अमृत कटारनवरे, जानू जाधव, सर्जेराव सातपुते, दिनकर लोंढे, बाळूशेठ भोईर, दत्तात्रय मोकल, किसनराव तळेकर, काशिनाथ पाटील, भगवानराव माने, राम म्हात्रे, गणपत गायकर, शरद पवार, शरद शिंदे, पांडुरंग शिंदे, विजय गोगले, कर्नल सिंग, नितीन ठक्कर, जयवंत घरत, अशोक कळके, के. डी. भालके, हेमंत नेहते, विष्णू बोराटे, नितीन यादव, ज्ञानदेव गुंजाळ, नरेंद्र म्हात्रे, पोपट कदम, अमित कारंडे, विलास श्रीखंडे, गणेश मदने, अविनाश कजबजे, सौ.कजबजे, कु.देवरे, राजेंद्र चौधरी, सागरकुमार रंधवे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सागरकुमार रंधवे यांनी केले.

Check Also

गणेशोत्सवानिमित्त सोमवारी शिवाजीनगर येथे श्री सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन

पनवेल : रामप्रहर वृत्त गणेश उत्सवानिमित्त सोमवारी (दि. 9) शिवाजीनगर येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ …

Leave a Reply