Breaking News

सार्वजनिक गणेश मंडळांना मंडप भाडे व अनामत रक्कम पूर्णतः माफ करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिका हद्दीतील सार्वजनिक गणेश मंडळांना मंडप भाडे व अनामत रक्कम पूर्णतः माफ करण्यात यावे, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली आहे.
या यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी निवेदन दिले असून या निवेदनात म्हटले आहे की, गणेशोत्सव २२ दिवसांवर आला असताना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची विविध परवानग्यांसाठी धावपळ सुरू आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दिलासा मिळावा या दृष्टीकोनातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप भाडे व अनामत रक्कम आकारण्यात येऊ नये, असा निर्णय घेण्यात आला आहे तसेच याची अंमलबजावणी म्हणून ठाणे महानगरपालिका आयुक्त यांनी हा निर्णय घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना या संदर्भात निर्देश दिले असल्याचे समजते. याच धर्तीवर पनवेल महानगरपालिका हद्दीतील परवानगीसाठी येणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप भाडे व अनामत रक्कम पूर्णः माफ करण्यात यावे, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply