कर्जत : प्रतिनिधी
माघी गणेशोत्सवानिमित्त कर्जत तालुक्यातील कडाव येथे कुस्त्यांचा आखाडा भरविण्यात आला होता. राज्याच्या विविध भागातील पैलवानांनी यात सहभाग घेतला. अंतिम फेरीत अनिल बामणे (मामा साहेब मोडक पुणे) आणि राहुल सदावते (मोतीराम तालीम पुणे) यांच्यात चुरशीची लढत झाली, मात्र दोन्ही पैलवान तुल्यबळ असल्याने लढत अनिर्णीत राहिली.
कुस्ती आखाड्याचे उद्घाटन आयोजक अशोक भोपतराव व पोलीस निरीक्षक अरुण भोर यांच्या हस्ते झालेे. या आखाड्यात केवळ पुरुषांनीच नव्हे; तर विविध भागातून मुलींनीसुद्धा भाग घेतला. लहान मुलांनी आपला ठसा उमटवत मोठ्यांना तोंडात बोट घालायला लावली. तब्बल 60 पुरुष पैलवान व 10 मुलींनी या खेळात आपले नशीब आजमावले. कर्जतमधील वैष्णवी गंगावणे या मुलीने चुणुक दाखवत बाजी मारली. तिचे सर्वांनी कौतुक केले. पंच म्हणून दीपक भुसारी व इतरांनी कामगिरी बजावली.
Check Also
कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक
कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …