Breaking News

ज्युनिअर राज्य अजिंक्यपद  कॅरम स्पर्धेस अलिबागेत प्रारंभ

अलिबाग : प्रतिनिधी
ज्युनिअर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेस मंगळवार (दि. 14)पासून प्रारंभ झाला. राज्यातील 270 कॅरम खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
रायगड जिल्हा कॅरम असोसिएशन व महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने अलिबाग येथील क्रीडाभवनात 55वी सब-ज्युनिअर व ज्युनिअर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष अरुण केदार, रायगड जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष व महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष गिरीश तुळपुळे, छत्रपती पुरस्कार विजेते नथुराम पाटील, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सेक्रेटरी यतीन ठाकूर, भाजपचे अलिबाग-मुरूड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, कमळ नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष सतीश पाटील, नंदकुमार चाळके, स्पर्धेचे पंचप्रमुख परवींदरसिंग, सहपंचप्रमुख योगेश फणसाळकर, सुहास कारभारी, रायगड जिल्हा कॅरम असोसिएशनचे कार्यवाह दीपक साळवी आदी उद्घाटन समारंभास उपस्थित होते.

Check Also

खोपोलीत 106 कोटींचे ड्रग्ज जप्त

पोलिसांची कंपनीत कारवाई, त्रिकूट ताब्यात खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खोपोली पोलिसांनी ढेकू गावच्या हद्दीतील एका …

Leave a Reply