Breaking News

बागेचीवाडीचा आदर्श सन्मान होणार

घरकुल भूमिपूजन कार्यक्रमात आमदार महेश बालदी यांचे प्रतिपादन
मोहोपाडा : प्रतिनिधी
कर्तव्यदक्ष आमदार महेश बालदी यांच्या हस्ते आपटा ग्रामपंचायत अंतर्गत सारसई बागेची वाडी येथे घरकुल भूमिपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बागेची वाडीला लवकरच आदर्श वाडीचा सन्मान मिळेल, असे आमदार महेश बालदी यांनी बोलताना व्यक्त केले.गेली तीन वर्षे सातत्याने पाठपुरावा करून याठिकाणी आदिम घरकुल योजना आणि विशेष केंद्रीय अर्थ सहाय्य योजने अंतर्गत एकूण 54 पक्क्या घरकुलांचे निर्माण करण्यात आले. या वाडीत एकूण 58 कुटुंब आहेत. येथील सर्व कुटुंबांचे पक्के घरकुल बांधण्याचे कार्य सुरू आहे शेवटच्या 11 घरकुल बांधकामाचे भमिपूजन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते नुकतेच झाले. या वाडीला लवकरच आदर्श वाडीचा सन्मान मिळेल, अशी आमदार महेश बालदी यांनी बोलताना व्यक्त केली. त्याचप्रमाणे माडभुवन आणि घेरावाडी यांचेदेखील पुनर्वसनाचे प्रस्ताव लवकरच मंजूर होतील यासाठी मी स्वतः मंत्रालय स्तरावर जलद गतीने पाठपुरावा करित आहे असे मत यावेळी बोलताना व्यक्त केले. तसेच या वाडीमध्ये सुसज्य असे बहु उद्देशीय सभागृह बांधण्यात येईल जिल्ह्यातील इतर वाड्याना या वाडीपासून नक्कीच प्रेरणा मिळेल असा विश्वास यावेळी बोलताना व्यक्त केले. तसेच इरशावाडीतील संकल्पित आराखड्याचे प्रकाशन देखील ग्रामस्थांसमवेत करण्यात आले. ग्रामस्थांनी पाना फुलांची रस्त्यावर रांगोळी काढून माझे स्वागत केल्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे आभार मानले. या वेळी माजी जि. प. सदस्य ज्ञानेश्वर घरत, केळवणे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष मंगेश वाकडीकर, पनवेल तालुका भाजपचे उपाध्यक्ष विद्याधर जोशी, आपटा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दत्ता पाटील, कराडे खूर्द माजी सरपंच विजय मिरकुटे, साईचे माजी सरपंच विद्या मोकल, ज्ञानेश्वर भोईर, भाजप नेते चंद्रकांत पाटील दिनेश पाटील, गणेश पाटील, जीवन टाकले सामजिक कार्यकर्ते रत्नाकर घरत सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच माडभुवन घेरावाडी आणि विविध वाड्यांचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply