Breaking News

किपचोगे, मुहम्मद सर्वोत्तम अॅीथलेटिक्सपटू

मोनॅको : वृत्तसंस्था

दोन तासांहून कमी वेळेत मॅरेथॉन शर्यत पूर्ण करणारा पहिला धावपटू ईलूड किपचोगे आणि 400 मीटर अडथळा शर्यतीमधील विश्वविजेती डॅलिया मुहम्मद यांना जगातील सर्वोत्तम अ‍ॅथलेटिक्सपटूचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

जागतिक अ‍ॅथलेटिक्स संघटनेतर्फे मोनॅको येथे झालेल्या शानदार कार्यक्रमात 35 वर्षीय किपचोगेला सन्मानित करण्यात आले. त्याने गेल्या महिन्यात 42.195 किलोमीटरचे मॅरेथॉन शर्यतीचे अंतर एक तास 59 मिनिटे आणि 40.2 सेकंदांत पूर्ण करून इतिहास घडविला होता, तर अमेरिकेच्या डॅलियानेही जुलै महिन्यात लोवा येथे अमेरिकन चाचणी शर्यतीत 52.2 सेकंदांचा विश्वविक्रम नोंदवला. दोहातील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तिने 52.16 सेकंदांचा नवा विश्वविक्रम साकारला.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply