Breaking News

ठाकरे गटाच्या पदाधिकार्‍यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्याची भूमिका तसेच राज्यात होत असलेल्या सर्वांगीण विकासावर प्रभावित होऊन अनेक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल होत आले. अशाच प्रकारे रत्नागिरी जिल्ह्यातील देवरूख येथील ठाकरे गटाच्या पदाधिकार्‍यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. 2) विकासाचे ‘कमळ’ हाती घेतले. पनवेलमधील भाजपच्या तालुका आणि शहर मध्यवर्ती कार्यालयात हा पक्षप्रवेश झाला.
या कार्यक्रमास भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल विधानसभा निवडणूक प्रमुख तथा जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, संगमेश्वर चिपळूण संपर्क प्रमुख प्रमोद अडतराव, रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष राजेश सावंत, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष अभिजीत शेट्टे, भाजप पनवेल शहर सरचिटणीस अमरीश मोकल, ज्योती देशमाने आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी ठाकरे गटाचे मनीष सावंत, राकेश महाडिक, सुबोध लोध, केतन ब्रिद, पंकज मांगवे, अनुल यादव, पृथ्वीराज यादव, युवराज महाडिक, संजय लिंगायत, अजय लिंगायत, विकास खांबे, गोविंद राठोड, समीर कदम, मिथुन बारगुडे, रोहन कदम, यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. मंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्रवेशकर्त्यांचे पक्षाची शाल देऊन भाजपमध्ये स्वागत केले तसेच जो विश्वास ठेवून तुम्ही प्रवेश केला आहे तो सार्थ होईल, असे प्रतिपादन केले.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply