Breaking News

तळोजा फेज वनला जोडणारा सबवे सुरू करा; भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी यांची मागणी

पनवेल ः प्रतिनिधी

तळोजा फेज वनला जोडणारा सबवे लवकरात लवकर सुरू करण्यात यावा, अशी मागणी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी यांनी सिडकोकडे केली आहे.

यासंदर्भात प्रल्हाद केणी यांनी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना लेखी निवेदन दिले आहे. तळोजा फेज वन येथे जाण्यासाठी कच्चा रस्ता तयार करण्यात आला आहे, परंतु काही दिवसांत पावसाळा सुरू होणार असून हा रस्ता कच्चा असल्यामुळे चिखल तयार होऊन नागरिकांना ये-जा करण्यासाठी गैरसोय होणार आहे. फेज वनला जोडण्यासाठी सबवे बनविण्यात आला असून सद्यस्थितीत तो बंद आहे. त्यामुळे येणारा पावसाळा आणि नागरिकांची गैरसोय लक्षात घेता फेज वनला जोडणारा सबवे पावसाळ्यापूर्वी सुरू करण्यात यावा, अशी मागणी प्रल्हाद केणी यांनी सिडकोकडे केली असून, यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनाही निवेदनाची प्रत माहितीस्तव देण्यात आली आहे.

Check Also

पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …

Leave a Reply