महिला बचत गटांना साहित्यवाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त
कार्यतत्पर आमदार महेश बालदी यांच्या निधीतून पनवेल तालुक्यातील आणि उरण विधानसभा मतदारसंघातील चिंचवण येथे रस्ता आणि बसथांबा निवारा शेडचे उद्घाटन तसेच वनविभागाच्या वतीने महिला बचत गटांना साहित्याचे वाटप शनिवारी (दि. 2) करण्यात आले. आमदार महेश बालदी यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला.
या कार्यक्रमास भाजप केळवणे जि.प.विभागीय अध्यक्ष मंगेश वाकडीकर, सांगुर्ली ग्रामपंचायतीच्या सरपंच पद्माकर कातकरी, प्रितेश मुकादम, माजी सरपंच दत्तात्रेय हातमोडे, नांदगावचे माजी सरपंच अविनाश गायकर, सदस्य विजय भोपी, शरद वांगीलकर, विष्णू ठोकळ, संतोष पारधी, पांडुरंग गायकर, मिनल चोरघे, वन विभाग अधिकारी राठोड, युवा नेता निलेश वांगीलकर, निलेश हातमोडे, अनिल वांगीलकर, संतोष वाजेकर, सुनील गवंडी, सुवर्णा पाटील, केशव ठोंबरे, परशुराम पाटील, सुनील म्हस्कर, गजानन ठोंबरे, भास्कर पाटील, मोहन पाटील, पंढरीनाथ ठोंबरे, संजय पोपेटा, अनंता पोपेटा, अमित पाटील, नितेश पाटील, विवेक भोईर, बळीराम भोईर, भाया भोईर, जगदीश पाटील, प्रतिक म्हसकर, राजा भोईर, गोपाळ भोेईर, चंद्रकांत पाटील, चंद्रकांत ठोंबरे, विकास ठोंबरे, भास्कर लेंडे, परेश ठोंबरे, एकनाथ कातकरी, बाळू लेंडे, बाबुराव लेंडे, बळीराम पाटील, नारायण पाटील, घे भरारी महिला ग्रामसंघाचे सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.