अलिबाग : प्रतिनिधी
कोकणात जाणारे गणेशभक्त तसेच चाकरमान्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने मुंबई-गोवा महामार्गावर विविध ठिकाणी सुविधा केंद्र सुरू करण्यात आलेली आहेत. यापैकी खारपाडा येथील सुविधा केंद्राचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 12) झाले.
या सुविधा केंद्रांवर प्रथमोपचार केंद्र, शौचालय व्यवस्था तसेच चहाचा स्टॉल या सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्या भाविकांचा प्रवास हा लांबचा असल्याने त्यांच्या वाहनचालकांना चहाची सुविधा मिळावी, त्याचप्रमाणे प्रवाशांना शौचालयाची व्यवस्था व्हावी या दृष्टीने ही सुविधा केंद्र सुरू करण्यात आल्याची माहिती मंत्री चव्हाण यांनी या वेळी दिली. मुंबई-गोवा महामार्गावर खारपाड्यापासून दर पंधरा किलोमीटरवर अशा प्रकारची सुविधा केंद्र सुरू करण्यात आली आहेत, असेही त्यांनी सांगितले.
मंत्रीमहोदयांच्या समवेत भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस दीपक बेहेरे, दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, कर्जत विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक
प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …