Breaking News

हिंसाग्रस्त भागात पुन्हा मतदान घ्या -गोयल

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

लोकसभा निवडणुकीचे सात टप्प्यांतील मतदान 19 मे रोजी संपले आहे. यादरम्यान मतदानाच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात बर्‍याच ठिकाणी हिंसाचाराच्या घटना समोर आल्या. याविषयी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी निवडणूक आयोगासोबत बैठक घेतली होती. आमच्या कार्यकर्त्यांसोबत झालेल्या मारहाणप्रकरणी आम्ही निवडणूक आयोगाशी चर्चा केली आहे. तसेच लोकसभा निवडणुकीच्या मतदानावेळी ज्या ठिकाणी हिंसा घडली तिथे पुन्हा मतदान घ्यावे, अशी मागणी आम्ही निवडणूक आयोगाकडे केल्याचे पीयूष गोयल यांनी सांगितले.

पहिल्या टप्प्यातील मतदानावेळी किरकोळ हिंसाचाराच्या घटना समोर आल्या होत्या. शेवटच्या टप्प्यात मात्र हे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळाले.

हिंसाचाराच्या सर्वाधिक घटना पश्चिम बंगालमध्ये घडल्या. या पार्श्वभूमीवर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी निवडणूक आयोगाकडे हिंसा झालेल्या बूथवर पुन्हा मतदानाची मागणी केल्याने निवडणूक आयोग याबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सहाव्या टप्प्यात पश्चिम बंगालमधील घटाल मतदारसंघात भाजपच्या उमेदवार व माजी आयपीएस अधिकारी भारती घोष यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला होता. केशपूर येथे मतदान केंद्र ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती कळताच त्या तिथे गेल्या. तेव्हा त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर दगडफेक करून गावठी बॉम्बचाही स्फोट घडवण्यात आला होता.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply