उरण : वार्ताहर
कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयात महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने मिशन युवा स्वास्थ्य अंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य के. ए. शामा यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांचे लसीकरण करणे व भारत कोविड मुक्त करणे हे आपले ध्येय असल्याचे यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालय विकास समितीचे सदस्य रमेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी डॉ. जी. के. देसाई (वैद्यकीय अधीक्षक, इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय उरण) यांनी कोविड-19 लसीकरणविषयी जनजागृती करून लसीकरणाविषयीचे गैरसमज दूर केले पाहिजे व लसीकरणाचा वेग वाढवला पाहिजे, असे सांगितले.
या वेळी आदिपरिचारिका हेमा म्हात्रे, परिचारिका प्राची ठाकूर, विलासिनी बोरवेकर यांनी विद्यार्थ्यांचे लसीकरण केले. या लसीकरण कार्यक्रमात एकूण 75 विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एनएसएस कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. डी. पी. हिंगमिरे, तानाजी घ्यार, साई कदम, रॉबिन म्हात्रे, निकेतन शामा व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.