Breaking News

सीकेटी विद्यालयात सहाय्यक शिक्षिका उज्ज्वला मोहिते यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ

पनवेल ः रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेलमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) माध्यमिक विद्यालयाच्या मराठी माध्यमिक विभागामध्ये मंगळवारी (दि. 31) उज्वला मोहिते यांच्या सेवापूर्ती सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे उपकार्याध्यक्ष वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी. गडदे, कार्यकारिणी सदस्या वर्षा प्रशांत ठाकूर तसेच उज्वला मोहिते यांचे कुटुंबीय यांच्या उपस्थितीत सेवापूर्ती कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी मुख्याध्यापक कैलास सत्रे व पर्यवेक्षक कैलास म्हात्रे यांचे मार्गदर्शन लाभले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. मुख्याध्यापक कैलास सत्रे यांनी उज्वला मोहिते यांच्या विद्यालयातील शैक्षणिक कार्याबद्दल माहिती दिली. उज्वला मोहिते यांनी 29 वर्ष ज्ञानदानाचे कार्य केले. मॅडमनी केलेल्या शैक्षणिक कार्याचा गौरव म्हणून रोटरी क्लब पनवेल यांच्याकडून शैक्षणिक वर्ष 2021-22मध्ये आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यकारिणी सदस्या वर्षा ठाकूर यांच्या हस्ते मोहिते मॅडम यांचा सन्मान करण्यात आला.
शैक्षणिक वर्ष 2022-23 मधील माजी विद्यार्थी तुषार लांबोर यांनी मनोगत व्यक्त केले. वैष्णवी शिंदे, कौस्तुभ खुटले या विद्यार्थ्यांनी मॅडमबद्दलचे आपले विचार मांडले. तनुजा मोरे व सारिका दिवेकर यांनी मनोगतातून आठवणींना उजाळा दिला. उज्वला मोहिते यांनी सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल संस्थेचे आभार मानले. या वेळी उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य प्रशांत मोरे, इंग्रजी माध्यम माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण, मराठी माध्यम प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सुभाष मानकर, इंग्रजी माध्यम पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका निलिमा शिंदे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राधिका शिर्के यांनी आभार प्रदर्शनाने केली.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply