Breaking News

मनसे कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल

पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल परिसरामध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाया वतीने होणार्‍या विकास कामांवर प्रभावित होऊन अनेक पक्षाचे नेते भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश करीत आहेत. आदई गावातील मनसेचे राज पाटील, आश्विन सिंग, जय शंकर, रोहीत झगडे यांनी बुधवारी भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. या प्रवेशकर्त्यांचे भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी पक्षाची शाल देऊन स्वागत केले. भाजपच्या शहर आणि तालुका मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य भुपेंद्र पाटील, माजी सरपंच महादू शेलके, जनार्दन पाटील, राजेश काकडे, जगदीश शेलके, निलेश पाटील, रोहित पाटील, ज्ञानेश्वर पाटील, जयेश पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

हम दिल दे चुके सनम @ 25

उत्कंठामय गोष्ट, देखणं सादरीकरण समीर (सलमान खान) भारतीय शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी या कलेतील निष्णात पंडित …

Leave a Reply