उरण : प्रतिनिधी
तालुक्यातील प्रतिष्ठेची समजल्या जाणार्या चिरनेर ग्रामपंचायतीची निवडणूक 5 नोव्हेंबरला होणार असून या निवडणुकीत राजकारणातील दोन मातब्बर घराणी आमने-सामने आली आहेत. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांविरोधात महाविकास आघाडीने उमेदवार उभे केले असून भारतीय जनता पक्षाचे थेट सरपंचपदाचे उमेदवार प्रतिक गोंधळी आणि त्यांच्या सहकारी सदस्यपदाच्या उमेदवारांना प्रचारात वाढता पाठिंबा मिळत आहे. भाजपने देशात नावीन्यपूर्ण योजना राबविल्या आहेत. या योजनांचा येथील नागरिकांना लाभ मिळवून देण्यासाठी, मी नेहमीच प्रयत्नशील राहीन, तरुणांसाठी रोजगाराची निर्मिती तसेच सुशिक्षित तरुण वर्गाला गावाच्या विकासासाठी एकत्र आणून, योग्य नियोजन करून त्यांच्या माध्यमातून मला गावाच्या विकासाचे काम करायचे आहे. गरिबांच्या ज्या काही छोट्या मोठ्या गरजा आहेत. त्या गरजा पूर्णत्वास नेण्यास मी नेहमीच प्रयत्न करीन. गावातील तरुणांचा मोठा पाठिंबा आहे. त्यांच्याही काही अपेक्षा आहेत. त्या अपेक्षा पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिली. भाजपने विकासाची कामे केली आहेत. भविष्यात समाजकार्याला अग्रक्रम देऊन, गावाच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहून, ग्रामपंचायत निवडणुकीतील माझे सहकारी उमेदवार रमेश फोफेरकर, सुशील पाटील, समीर डुंगीकर,रमेश गोंधळी, अजिंक्य ठाकूर, अंकित म्हात्रे, सिताराम कातकरी, प्रणोती पाटील, सरिता खारपाटील, अश्विनी कातकरी, मेघा चिर्लेकर, अश्विनी नारंगीकर, वनश्री खारपाटील या सर्वांना सोबत घेऊन गावाच्या चांगल्या कामासाठी सहकार्य करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Check Also
पनवेल शहरातील वाहनतळाचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास आता मदत मिळणार असून आमदार …