आमदार महेश बालदी यांचे चिरनेरमध्ये प्रतिपादन
उरण ः प्रतिनिधी
जात, पात, धर्म, पंथ भेदाचे राजकारण करू नका, तर विकासाचे राजकारण करा. परिवर्तनाच्या विकासाची आज गरज आहे, असे प्रतिपादन आमदार महेश बालदी यांनी केले. ते गुरुवारी (दि. 2) चिरनेर येथील सभेत बोलत होते. उरण तालुक्यातील चिरनेर ग्रामपंचायतीमध्ये भाजपचे थेट सरपंचपदाचे उमेदवार प्रतिक गोंधळी आणि सदस्यपदाचे उमेदवार रमेश फोफेरकर, सुशील पाटील, अंकित म्हात्रे, समीर डुंगीकर, अजिंक्य ठाकूर, रमेश गोंधळी, सीताराम कातकरी, अश्विनी कातकरी, प्रणोती पाटील, सरिता खारपाटील, अश्विनी नारंगीकर, वनश्री खारपाटील, मेघा चिरलेकर यांच्या प्रचारार्थ भाजप मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत जाहीर प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.
या सभेस भाजपचे ज्येष्ठ नेते पी.पी.खारपाटील, उरण तालुका अध्यक्ष रविशेठ भोईर, भाजप नेते राजेंद्र खारपाटील, उरण शहराध्यक्ष कौशिक शाह, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष राणी म्हात्रे, संजीवकुमार भगत, उद्योजक अरुण भगत, भाजपचे शशिकांत पाटील, माजी उपसरपंच प्रियांका गोंधळी, धनंजय गोंधळी, सुशांत पाटील आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. आपल्या भाषणात आमदार महेश बालदी म्हणाले की, परिवर्तन आणि विकास भारतीय जनता पक्षच घडवू शकतो, कारण भाजप केंद्रात व राज्यात सत्तेवर आहे. मागील विधानसभा निवडणुकीत या गावासाठी मी पाच कोटी रुपयांचा निधी आणून दिला हे चिरनेरकरांना ठावूक आहे. आता तर आम्ही दोन आमदार आहोत. चिरनेर गावासाठी अजून तीन कोटींचा निधी उपलब्ध करून देणार आहे. निधी आणण्याची धमक आमच्यात आहे. चिरनेर गावाचा चेहरामोहरा बदलायचा असेल, तर या निवडणुकीत सरपंचपदाचे उमेदवार प्रतीक गोंधळी आणि त्यांच्या सदस्यपदाच्या सहकारी उमेदवारांना बहुमताने विजयी करा. या गावाचं नंदनवन बनवू. पुढे बोलताना त्यांनी स्वार्थासाठी एकत्र आलेल्या पक्षांमध्ये निधी आणण्याची धमक आहे का, असा सवाल केला. आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, चिरनेर ही क्रांतिकारकांची भूमी आहे. येथे विकासात्मक परिवर्तनासाठी भारतीय जनता पक्षाला आपले अमूल्य मत द्या. आम्ही दोन्ही आमदार या गावाच्या विकासासाठी भावी सरपंच प्रतीक गोंधळी यांच्या पाठिशी उभे राहून या गावाचा विकास साधण्याचा प्रयत्न करू. येथील आदिवासी बांधव वीज, पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. त्यांना येथील गाव पुढार्यांनी विकासापासून वंचित ठेवले आहे. येथे खर्या अर्थाने विकास करायचा असेल तर भाजपशिवाय पर्याय नाही. आदिवासी बांधवांच्या परिपूर्ण विकासासाठी मी कटिबद्ध आहे. त्यांच्याकरिता चार हजार घरकुलांची तरतूद केली आहे, याची पूर्तता लवकरच होईल. विरोधकांनी कोणता विकास केला ते दाखवा. फक्त घोषणा करण्यात ते पटाईत आहेत. श्री महागणपतीच्या आशीर्वादाने प्रतीक गोंधळी आणि त्यांच्या सहकारी उमेदवारांना नक्कीच यश येईल. या सभेस भाजपचे कार्यकर्ते समीर खारपाटील, सागर खारपाटील, करण पाटील, स्वप्नील पाटील, संजय गोंधळी, संताजी गोंधळी, प्रकाश गोंधळी, नमस्ते मोकल, सुधीर पाटील, सुजित पाटील, नारायण गोंधळी, योगेश खारपाटील, संदीप गोंधळी, जयेश खारपाटील, स्वप्नील खारपाटील, अनिकेत गोंधळी, बबन गोंधळी, नितीन गोंधळी, सुहास गोंधळी, शेखर गोंधळी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.