उरण : वार्ताहर
ओएनजीसी कंपनीच्या पाइपलाइनमधून तेलगळती झाल्याची घटना रविवारी (दि. 23) सायंकाळी घडली. वेळीच ही बाब निदर्शनास आल्याने पुढील अनर्थ टळला. सध्या पाइपलाइन दुरूस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
पीरवाडी समुद्रकिनारी असलेल्या ओएनजीसी कंपनीच्या पाइपलाइनमधून रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास तेलगळती होण्यास सुरुवात झाली. अडीचशे किलोमीटर दूरवर असणार्या बॉम्बे हाय येथून अरबी समुद्रामधून उरण ओएनजीसी कंपनीसाठी टाकण्यात आलेल्या टर्बाईन लाइनमधून ही गळती झाली.
गळती झालेले तेल कोणते आहे हे समजले नाही, मात्र तेल समुद्रात जाऊ नये यासाठी कंपनी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. या ठिकाणी ओएनजीसी प्रकल्पातील तज्ज्ञ कर्मचार्यांची नेमणूक करून तेलगळती थांबविण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. वेळीच उपाययोजना केल्याने गेल्या वर्षी घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टळली. त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
Check Also
सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …