उरण ः रामप्रहर वृत्त
तालुक्यातील दिघोडे ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक येत्या 5 नोव्हेंबर रोजी होणार आहे. माजी सरपंच सोनिया मयूर घरत यांच्या मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात गावात विविध विकासकामे झाली. यामुळे या वेळीदेखील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीच्या ग्रामविकास आघाडीला पुन्हा एकदा ग्रामस्थ संधी देतील, असा दावा कार्यकर्त्यांनी केला आहे. या वेळी ग्रामविकास आघाडीचे थेट सरपंचपदाचे उमेदवार मयूर घरत, प्रभाग 1मधून रितेश लक्ष्मण कोळी, ललिता जगदीश कोळी, रुपाली रोहन कोळी, प्रभाग 2मधून निलेश बामा पाटील, पूजा अभिजित पाटील, श्रद्धा गणेश म्हात्रे, प्रभाग 3मधून समीर गजानन ठाकूर, लक्ष्मी हरजीवन ठाकूर, पूजा संदिप पाटील यांच्यासमोर काँग्रेस-शेकाप अशी लढत आहे. मागील पाच वर्षांच्या सोनिया घरत यांच्या ग्रामविकास आघाडीच्या माध्यमातून विविध विकासकामे झाली आहेत. या विकासकामांमुळेच ग्रामविकास आघाडीचे थेट सरपंचपदाचे उमेदवार मयूर घरत यांच्यासह इतर उमेदवारांना मतदारांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. बुधवारी (दि. 1) काढण्यात आलेल्या ग्रामविकास आघाडीच्या प्रचार रॅलीला मतदारांचा प्रचंड प्रतिसाद लाभला होता. रॅलीमध्ये भाजप जिल्हा उपाध्यक्ष निळकंठ घरत, प्रसाद पाटील, अजित पाटील, काशीनाथ पाटील, रमण कासकर, माजी शिवसेना शाखाप्रमुख अनिल पाटील, प्रल्हाद कासकर, अश्विन पाटील, प्रदीप पाटील आदींसह ग्रामविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Check Also
कर्जतमध्ये तिहेरी हत्याकांड
जमिनीच्या वादातून कुटुंबातील तिघांचा खून; संशयित तरुण पोलिसांच्या ताब्यात कर्जत, नेरळ : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील …