पनवेलमध्ये अमृत टप्पा 2.0 योजनेंतर्गत विकासकामांचे भूमिपूजन

विकासासाठी भाजप कटिबद्ध -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका क्षेत्राचा विकास करण्यासाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 3) विकासकामांच्या शुभारंभावेळी केले.
भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 1,2,3 आणि 4मधील देवीचा पाडा, खारघर, रोहिंजण, तळोजा पाचनंद या गावांमध्ये अमृत टप्पा 2.0 योजनेंतर्गत पाण्याची टाकी उभारणे तसेच नवीन पाईपलाईन टाकण्यात येणार आहेत. या विकासकामांचे भूमिपूजन पनवेल महापालिकेच्या माजी महापौर डॉ. कविता चौतमोल आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी झाले.
या कार्यक्रमांना भाजप नेते प्रल्हाद केणी, खारघर मंडल अध्यक्ष प्रवीण पाटील, माजी नगरसेवक हरेश केणी, नरेश ठाकूर, अभिमन्यू पाटील, नेत्रा पाटील, ब्रिजेश पटेल, अनिता पाटील, किरण पाटील, रमेश फडकर, हरेश केणी, सचिन वास्कर, गीता चौधरी, निर्मला यादव, महेश पाटील, विनोद घरत, नंदकुमार म्हात्रे, प्रभाग क्रमांक 2चेअध्यक्ष कृष्णा पाटील, तालुका उपाध्यक्ष राम पाटील, सचिन म्हात्रे, महेश पाटील, अशोक साळुंखे, श्रीनाथ पाटील, काळुराम फडके, माजी सरपंच केसरीनाथ म्हात्रे, अ‍ॅड. पवन भोईर, विजय म्हात्रे, महेंद्र म्हात्रे, आकाश फडके, सागर भोईर, भरत कराड, सुरेश फडके यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.

Check Also

युवा वॉरियर्सच्या पदाधिकार्‍यांची नियुक्ती

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता युवा मोर्चा …

Leave a Reply