Breaking News

स्व. रामजी बेरा यांच्यावर अंत्यसंस्कार

आमदार प्रशांत ठाकूर यांनी वाहिली श्रद्धांजली

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेचे खारघरमधील माजी नगरसेवक रामजी बेरा यांचे बुधवारी वयाच्या 53व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सेक्टर 14 येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत गुरुवारी (दि. 16) शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी भाजप मावळ लोकसभा प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी रामजी बेरा यांना श्रद्धांजली वाहिली.
पनवेल महापालिका प्रभाग क्रमांक 5चे भाजपचे नगरसेवक राहिलेले रामजी बेरा हे मितभाषी, दांडगा जनसंपर्क असणारे लोकप्रतिनिधी आणि यशस्वी उद्योजक होते. समाजातील दानशूर व्यक्ती म्हणून त्यांचा नावलौकिक होता. त्यांच्या निधनाने खारघरमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
रामजी बेरा यांच्या अंत्यसंस्कारावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, महापालिकेच्या माजी महापौर कविता चौतमोल, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजप पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, खारघर शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, प्रल्हाद केणी, माजी नगरसेवक अभिमन्यू पाटील, अजय बहिरा, नरेश ठाकूर, माजी नगरसेविका वृषाली वाघमारे, राजश्री वावेकर, ब्रिजेश पटेल, किर्ती नवघरे, वासुदेव पाटील, प्रभाकर जोशी, किरण पाटील, अमर उपाध्याय यांच्यासह त्यांना मानणारा वर्ग आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी उपस्थितांनी रामजी बेरा यांंचे अंतिम दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली.

पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक रामजी बेरा यांचे समाजकार्य खूप मोठे होते. त्यांच्या जाण्याने भारतीय जनता पक्ष तसेच बेरा यांच्या परिवारामध्ये कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. हे दुःख सहन करण्याची ताकद ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना देवो!
-प्रशांत ठाकूर, आमदार

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply