आमदार महेश बालदी यांच्याकडून स्वागत
मोहोपाडा : रामप्रहर वृत्त
माझगाव ग्रामपंचायतीचे शेतकरी कामगार पक्षाचे माजी उपसरपंच अरुण जाधव यांनी रविवारी (दि.26) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी त्यांचे स्वागत केले.
आमदार महेश बालदी यांच्या विकासात्मक कार्यप्रणालीवर आकर्षित होऊन विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल होत आहेत. अशाच प्रकारे माझगावचे शेकापचे माजी उपसरपंच अरुण जाधव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
मोहोपाडा येथील भाजप कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास भाजपचे खालापूर तालुका उपाध्यक्ष किशोर देवघरे, आकाश जुईकर, संदीप म्हात्रे आदी उपस्थित होते.