Breaking News

उरण मतदारसंघात विकासकामांचा धडाका

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते भूमिपूजन, उद्घाटन

उरण ः रामप्रहर वृत्त
उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे सातत्याने सुरू आहेत. या अंतर्गत वडविहीर, लोधिवली, कलोते, कर्जत, नढाळ, हातनोली, तारवाडी, भिलवले, कोयना येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते रविवारी (दि. 17) करण्यात आले.
उरण विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नातून अनेक विकासाची कामे सुरू आहेत. या अंतर्गत वावर्ले येथे रस्ता काँक्रिटीकरण करणे 10 लाख, कर्जत-चौक रस्ता तयार करणे 10 कोटी, आंबेवाडी आणि हाशाची पट्टी जलजीवन मिशन योजनेंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन एक कोटी 25 लाख, कलोते येथील मुख्य रस्ता काँक्रिटीकरण एक कोटी, वडविहीर गावातील बौद्धवाडा येथे सभागृह बांधणे 40 लाख, लोधिवली गावाच्या मुख्य रस्ता काँक्रिटीकरण एक कोटी, नढाळ येथे अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण 30 लाख, हातनोली येथे अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरणाचे लोकार्पण या कामासाठी 50 लाख, भिलवले येथे जलजीवन मिशन योजनेंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन 60 लाख, तारवाडी येथे अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण 65 लाख, कोयना येथे अंर्तगत रस्ते आणि गटारे यासाठी एक कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. या सर्व कामांचे भूमिपूजन, उद्घाटन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, रामदास ठोंबरे, खालापूर तालुकाध्यक्ष प्रवीण मोरे, चौक ग्रामपंचायतीच्या सरपंच रितू ठोंबरे, गणेश मुकादम, बोरगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच जागृती मोरे, उंबवाडी बेरोसेच्या सरपंच पार्वती भस्मा, बोरगावचे माजी सरपंच प्रितेश मोरे, उपसरपंच कमळू पारधी, तुपगावचे सरपंच रवींद्र कुंभार, अरुण वावरले, मंदार उतेकर, विजय काईनकर, गोविंद पिरकट, सचिन ठोंबरे, निलेश ठोंबरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply