पनवेल : रामप्रहर वृत्त
गेल्या काही दिवसांपासून नवीन पनवेलला पाणीप्रश्न भेडसावत असून नवीन पनवेलचा पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करावा, या मागणीसाठी बुधवारी (दि. 20) पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली नवीन पनवेल सिडको कार्यालयाला धडक दिली. या वेळी नवीन पनवेलचा पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत न केल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा परेश ठाकूर यांनी सिडको प्रशासनाला दिला. यावर येत्या दोन ते तीन दिवसात नवीन पनवेलचा पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल, असे आश्वासन सिडकोचे कार्यकारी अभियंता भगवान गायकवाड यांनी दिले.
गेल्या अनेक दिवसांपासून नवीन पनवेलचा पाणीप्रश्न जटिल झाला असून पाण्यावाचून नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. याबाबत सिडकोकडे वारंवार पाठपुरावा करूनदेखील कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांनी सदर समस्या माजी स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी यांच्या निदर्शनास आणून त्यांनी माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची भेट घेतली. या बाबत परेश ठाकूर यांनी सिडको कार्यालयाला सहकार्यांसह धडक देऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली. या वेळी पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, माजी प्रभाग समिती सभापती समीर ठाकूर, पनवेल शहर महिला मोर्चा अध्यक्षा राजश्री वावेकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. येत्या दोन ते तीन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करणार असल्याचे आश्वासन सिडको अधिकार्यांनी दिले, मात्र आश्वासनाची पूर्तता न झाल्यास माजी स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे, असे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सांगितले.
Check Also
सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक
प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …