Breaking News

पृथ्वी आणि माझा दर्जा वेगळा -गिल

कोलकाता : वृत्तसंस्था

पृथ्वी शॉ आणि माझ्या फलंदाजीचा दर्जा वेगळा असून, आम्हा दोघांमध्ये तुलना होऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया कोलकाता नाइट रायडर्सचा युवा फलंदाज शुभमन गिलने व्यक्त केली.

गिलने मुंबई इंडियन्सविरुद्ध 76 धावांची धडाकेबाज खेळी साकारली. यंदाच्या हंगामात त्याने दोन्ही अर्धशतके सलामीला येऊन झळकावली आहेत. त्यामुळे फलंदाजीच्या क्रमाविषयी त्याला विचारले असता गिल म्हणाला, ख्रिस लिन व सुनील नारायण आमच्यासाठी सलामीला चांगली कामगिरी करीत आहेत. त्यामुळे मला मधल्या फळीतही खेळायला आवडते. संघ व्यवस्थापन सांगेल त्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी मी तयार असून संघाच्या विजयात योगदान देणे हेच माझे मुख्य लक्ष्य आहे.

पृथ्वी शॉबद्दल गिलने सांगितले की, पृथ्वी एका वेगळ्या दर्जाचा व शैलीचा फलंदाज आहे. तो सुरुवातीपासूनच आक्रमकतेवर भर देतो; तर माझी शैली किंचित वेगळी आहे, मात्र आमच्या दोघांची तुलना करणे चुकीचे ठरेल. आम्ही गेली दोन-तीन वर्षे एकत्र क्रिकेट खेळत आहोत व पृथ्वीसोबत खेळताना मला नेहमीच मजा येते.

Check Also

‘प्रेम नगर’ है यह अपना….

हिंदी चित्रपटाने बायस्कोपपासून ओटीटीपर्यंत, सोळा एमएमपासून सत्तर एम.एम, सिनेमास्कोपपर्यंत, रस्त्यावरच्या पोस्टरपासून ते डिजिटल युगापर्यंत, मोनो …

Leave a Reply