Breaking News

रोह्यात शस्त्रसाठा जप्त; तरुणाला अटक

रोहा, धाटाव, अलिबाग : प्रतिनिधी
रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) सोमवारी (दि. 8) रात्री रोहा शहरातील धनगरआळी येथून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तन्मय सतिश भोकटे (वय 24) याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी काही लोकांना अटक होण्याची शक्यता आहे.
रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी मंगळवारी (दि. 9) पत्रकार परिषदेत याबाबत दिली. अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे या वेळी उपस्थित होते.
रोहा शहरातील धनगरआळी येथील एका तरुणाकडे अग्निशस्त्रे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे, हवालदार जितेंद्र चव्हाण, रूपेश निगडे, नाईक विशाल आवळे, शिपाई अक्षय सावंत, मोरेश्वर ओमले याचे पथक तयार केले. या पथकाने सोमवारी रात्री धरगरआळी येथे जाऊन तन्मय भोकटे याच्या घराची झडती घेतली. या वेळी चार बाराबोर बंदूक, एक देशी बनावटीचे रिव्हॉल्वर, पाच धारदार चाकू, दोन धारदार तलवारी, सहा कोयते, 90 जिवंत काडतुसे, पाच रिकामी काडतुसे, बंदूक व काडतुसे बनवण्याचे साहित्य, हरिण व इतर प्राण्यांच्या 22 शिंगांची जोडी आणि शस्त्रे बनविण्यासाठी लागणारे साहित्य आढळून आले. पोसिांनी हा सर्व शस्त्रसाठा जप्त करून तन्मयला अटक केली.
देशी बनावटीचे रिव्हॉल्वर विकत घेतले. बाकी इतर सर्व बंदुका, तलवारी, कोयते चाकू स्वतः बनविल्याचे तन्मय भोकटे याने पोलिसांना सांगितल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनथ घार्गे यांनी दिली.
या प्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम 1959चे कलम 3,4,5(क),(ख),7(क),(ख),25 वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972चे कलम 2 (31),48,51 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक धनाजी साठे व पथक करीत आहे.

Check Also

खासदार सुनील तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

महायुतीकडून विजयाचा निर्धार अलिबाग : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांनी …

Leave a Reply