Breaking News

जुन्या पाठ्यपुस्तकांचे दान ठरतेय मोलाचे

हजारो मुलांच्या पालकांचा खर्च वाचला

वैशाली जगदाळे यांचा उपक्रम यशस्वी

पनवेल : वार्ताहर

शैक्षणिक वर्ष संपले की ती पाठ्यपुस्तक आता रद्दीत दिले जातात. परंतु ही पुस्तक दुसर्‍या विद्यार्थ्यांसाठी वापरले जाऊ शकतात. याचे महत्त्व कामोठे येथील एका शिक्षकाने समाज माध्यमातून अनेक पालकांना पटवून दिले. त्यामुळे आता या पुस्तकांची आदली बदली करून लाखो रुपयांचा खर्च खर्‍या अर्थाने वाचण्यात आला आहे. त्याचबरोबर यातून पुस्तकांचे महत्त्व पटवून देण्यामध्ये संबंधित शिक्षिकेने यश मिळवले आहे.

2020-21 हे शैक्षणिक वर्षात ऑनलाइन शिक्षण चालू झाले. आयसीएसई, सीबीएससी, स्टेट बोर्डचे सर्व वर्ग ऑनलाइन चालू झाले. शेवटी शिक्षणमंत्र्यांनी कोविडमुळे सर्व परीक्षा रद्द केल्या. दहावीची सुद्धा परीक्षा यावर्षी घेण्यात येणार नाही. शैक्षणिक फी, पुस्तके, कपडे यासाठी पालकांनी खर्च कसाबसा केला. कोरोनामुळे केवळ जागतिक महामारी निर्माण केली नाही. तर आर्थिक पेच निर्माण केला. आपल्या पाल्यांना शिक्षण देण्यासाठी कित्येक पालकांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. एका खाजगी शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करणार्‍या वैशाली जगन्नाथ जगदाळे या संकल्प फाउंडेशन चालवतात. त्याच्या  ग्रुपवर त्यांनी कोणाला पुस्तके हवी आहेत  का, असा मेसेज पाठवला. त्यात त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. यासाठी त्यांना विविध क्षेत्रातील ओळखी अनोळखी मित्र मैत्रिणींनी मदत केली. जयश्री झाले, नवनाथ भोसले, तुषार सावंत, संकल्प फाऊंडेशनच्या उपाध्यक्ष रुपाली कदम, ललिता इनकर, सुषमा घाडगे असे बरेच जण जोडले गेले.

कामोठे येथील भाजपचे स्थानिक नेते के. के. म्हात्रे यांनी सुद्धा आपल्या मुलांचे पुस्तके दिली. ’पालक कमिटी बुक ऑफ एक्सचेंज फ्री ऑफ कॉस्ट’ या नावाने वैशाली जगदाळे यांनी तीन गृप तयार केले. सर्व शाळाच्या पालकांना लिंक जॉईन केली. ही लिंक गुगल फॉर्ममध्ये तयार करण्यात आल्याने त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. खारघरमधील संजय त्रिवेदी, आशिष म्हात्रे, ललिता इनकर, संजय गोधळी, मच्छिंद्र कणसे यांनी वेळोवेळी मार्गदर्शक केले. प्रतिभा ताई यांची सोबत मिळाली, सर्व प्रथम गिरिजा आश्रमातील मुलांना नववी, दहावीची पुस्तके या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले. जवळपास साडेतीन हजार पालकांनी पुस्तके आदलाबदलीसाठी या उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवला.

जूनियर केजीपासून ते बारावीपर्यंत सर्व बोर्डाची यावर्षीची पुस्तक इतर विद्यार्थ्यांना देण्यात आली. त्यांची पुस्तक मागील वर्गातून पुढच्या वर्गात येणार्‍या विद्यार्थ्यांकरता पुरवण्यात आली. केवळ नवी मुंबई पनवेलच नव्हे तर प्रामुख्याने पुणे, नाशिक, सातारा, येथे हा उपक्रम चालू आहे. सरासरी 3500 मुलांना याचा फायदा झाला असल्याचे संकल्प फाऊंडेशनकडून सांगण्यात आले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply