विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, निबंध स्पर्धा
पनवेल : प्रतिनिधी – कोरोनामुळे व्यक्ती, कुटुंब, देश आणि जगावर झालेल्या परिणामांबद्दल मला काय वाटतं? यासाठी स्मार्ट ब्रेन स्किल्स अॅण्ड एज्युकेशन आणि नॅचरल हेल्थ अॅण्ड एज्युकेशन फाऊंडेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने निबंध आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धेचे विषय 1) कोरोना : वस्तुस्थिती, उपाय परिणाम माझ्या नजरेतून, 2) थाळीनाद ते दिवापर्व-एक दृष्टिकोन माझाही, 3) जागतीक लॉकडाऊन निसर्गाच्या नजरेतून, 4) भारतीय जीवनपद्धती जागतीक समस्येवर उपाय, 5) जिंकणं महत्वाचं – माझं की निसर्गाचं? ही स्पर्धा 3 गटांमध्ये असेल. यामध्ये निबंध गटात तीन गट आहेत. इयत्ता 5वी ते 7वी, इयत्ता 8वी ते 10वी, इयत्ता 11वी 12वी असे अनुक्रमे गट आहेत. तर चित्रकला गटात देखील तीन पुढील अनुक्रमे गट आहेत. इयत्ता 1ली ते 4वी, इयत्ता 5वी ते 7वी, इयत्ता 8वी ते 10वी.
स्पर्धेचे नियम व अटी पुढीलप्रमाणे आहेत. निबंध स्पर्धकाने कोणत्याही वरीलपैकी एका विषयावर 500 ते 700 शब्दांमध्ये (1/2 फूल स्केप पेपर)लिहलेला असावा, चित्रकला स्पर्धकाने -3 / -4 (स्केच बुकमधील कागद जो उपलब्ध असेल तो) पेन्सिल शेडिंग किव्हा कोणतेही रंग वापरून चारी बाजूने एक सेंटीमीटर बॉर्डर सोडून चित्र काढावे, निबंध मराठी, हिंदी आणि इंग्रजी मध्ये लिहिता येईल, प्रत्येक गटात 1 विजेत्याला बक्षिस देण्यात येईल जिंकणार्या स्पर्धकाला मानाचे सन्मानचिन्ह (ट्रॉफी) सन्मानपत्र (सर्टिफिकेट) दिली जातील, सहभागी होणार्या सर्व स्पर्धकांना सर्टिफिकेट दिले जाईल, सर्व जिंकलेल्या स्पर्धकांची यथोचित प्रसिद्धी केली जाईल, स्पर्धेच्या नियमात ऐनवेळी बदल करण्याचे हक्क संस्थेकडे राखीव आहेत, विशिष्ट जात व धर्म ह्याचा निबंधामध्ये उल्लेख करू नये, आपले नाव, इयत्ता उजव्या बाजूला ठळक अक्षरात लिहावे.
तसेच ही स्पर्धा निःशुल्क आहे. स्पर्धकाने नाव, इयत्ता पहिल्या पानावर ठळकपणे लिहावी आणि स्पष्ट स्कॅन अथवा फोटो, 30 एप्रिलपर्यंत 8850143585 ह्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवायचे आहेत. बक्षीस वितरण बाबत लॉकडाऊन नंतर जाहीर केले जाईल, स्पर्धा घरातूनच द्यायची आहे. अशी माहिती काऊन्सिलर दिपक खाडे यांनी दिली.
नवी मुंबई महापालिकेतर्फे निबंध, कविता स्पर्धा
नवी मुंबई : बातमीदार – कोरोना काळात नागरिकांच्या मानसिकतेचा सखोल विचार करतानाच त्यांच्या अंगभूत कल्पकतेला आणि प्रतिभेला संधी मिळावी, विचार क्षमतेला चालना मिळावी यादृष्टीने नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या संकल्पनेतून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कोरोनाशी लढा-निरोगी रहा या विषयावर कोविड-19 प्रतिबंधात्मक निबंध आणि कविता स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना कोरोना विषयीच्या लढ्यातील आपले अनुभव, सूचना, संकल्पना सादर करण्याची संधी मिळणार असून निबंध स्पर्धेतील सहभागाकरीता 700 शब्दांचा निबंध तसेच कविता
स्पर्धेतील सहभागाकरिता 16 ओळींची कविता ही मराठी, हिंदी, इंग्रजी यापैकी एका भाषेत पीडीएफ स्वरूपात 1 मेपर्यंत पाठवावयाची आहे.
लॉकडाऊनच्या काळात घरातच असलेल्या नागरिकांना विचारप्रणव बनविण्यासाठी ही निबंध व कविता स्पर्धा अत्यंत महत्वाची ठरणार असून या निमित्ताने नागरिक कोरोना विषयीच्या नकारात्मक विचारांपासून दूर जातीव व कोरोना विरोधातील लढ्याबाबत सकारात्मक विचार करतील असा विश्वास व्यक्त करीत महापालिका आयु्क्त अण्णासाहेब मिसाळ यांनी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील जास्तीत जास्त नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.