Breaking News

प्रेम संबंधातून तरुणाची आत्महत्या

महाड : प्रतिनिधी
महाड शहरातील काकरतळे परिसरात राहणार्‍या एका तरुणाने प्रेम संबंधातून आत्महत्या केल्याचे शुक्रवारी (दि. 12) रात्री उघड झाले. ज्या तरुणीशी त्याचे प्रेम संबंध होते तिचे लग्न ठरल्याच्या कारणातून त्याने आत्महत्या केली असे पोलीस सूत्रांनी सांगितले. महाड शहरातील काकर तळे परिसरात असलेल्या प्रसिद्ध व्हाईट हाऊस या इमारतीमध्ये विनायक बद्रीनाथ फुके (वय 25, मूळ राहणार अंजनी बुद्रुक, मेहकर बुलढाणा) याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली आहे. गावात राहणार्‍या एका मुलीबरोबर त्याचे गेली पाच वर्षांपासून प्रेम संबंध होते, मात्र या मुलीचे लग्न ठरल्यामुळे विनायक हा अस्वस्थ होता यातूनच त्याने आत्महत्या केली असल्याचे महाड शहर पोलीस सूत्रांनी सांगितले. याबाबत महाड शहर पोलीस ठाण्यात देवेश विजय शहा यांनी खबर दिली असून याबाबत महाड शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू झाल्याची रजिस्टर वर नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास महाड शहर पोलीस करीत आहेत.

Check Also

खासदार सुनील तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

महायुतीकडून विजयाचा निर्धार अलिबाग : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांनी …

Leave a Reply