खारघर : रामप्रहर वृत्त
अयोध्या येथे 22 जानेवारीला होत असलेल्या प्रभू रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्याचा बहुमान देशातील 11 दाम्पत्यांना मिळाला आहे. त्यात खारघरमधील कांबळे दाम्पत्याचा समावेश आहे. हे निमंत्रण मिळाल्याने विठ्ठल कांबळे आणि त्यांची पत्नी उज्वला कांबळे यांच्यासह कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला आहे.
अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्याची तयारी शेवटच्या टप्यात आहे. यानिमित्ताने अवघा देश राममय झाल्याचे पहावयास मिळत आहे. अयोध्येतील मंदिरात राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असताना 11 विशेष जोडप्यांना विशेष निमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये खारघर येथील कांबळे दाम्पत्यही सहभागी होणार आहे. विशेष म्हणजे मंदिराच्या गर्भगृहात पूजा करण्याचे सौभाग्य त्यांना मिळणार आहे.
विठ्ठल कांबळे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असून त्यांना मिळालेल्या या बहुमानाबाबत बोलताना त्यांनी कुटुंबात दिवाळी साजरी होत असल्याची भावना व्यक्त केली. 20 रोजी कांबळे दाम्पत्य आयोध्येकडे रवाना होणार आहे.
Check Also
सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक
प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …