Breaking News

नमो चषक अंतर्गत कबड्डी स्पर्धा उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त
मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली नमो चषक 2024 अंतर्गत भव्य कबड्डी स्पर्धा कामोठे येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 19) झाले.
उद्घाटन समारंभास माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक संजय भगत, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, माजी नगरसेवक विजय चिपळेकर, डॉ. अरुणकुमार भगत, तेजस कांडपिळे, भाजप नेते प्रदीप भगत, महिला मोर्चाच्या मनीषा वनवे, छाबा फाउंडेशनचे अध्यक्ष दामोदर चव्हाण, भाऊ भगत, सुशील शर्मा, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, युवा नेते हॅप्पी सिंग, युवा मोर्चा कामोठे शहर अध्यक्ष तेजस जाधव, सुर्यकांत ठाकूर, आदित्य भगत, सुयोग वाफारे, आयुष केंद्रे, अमोल बिनवडे, सागर ठाकूर, किरण जाधव, हर्षवर्धन पाटील, अजय मोरे, शंकर कारंडे, अमोल जाधव, सचिन यमगर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कबड्डीप्रेमी उपस्थित होते.
लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने घेतलेल्या आंतरराष्ट्रीय भरारी आणि देशाच्या झालेल्या विकासाबद्दल आदरभावना व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष कार्यकारिणीने दिलेल्या निर्देशानुसार युवा मोर्चाच्या संयोजनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात नमो चषक स्पर्धा होत आहेत. त्या अनुषंगाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभा क्षेत्रात भव्य क्रीडा, कला आणि सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला असून शुक्रवारी कामोठ्यातील लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल येथे नमो चषक भव्य कबड्डी स्पर्धा रंगली.

Check Also

कामोठे कॉलनी फोरमचे पदाधिकारी भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्त देशाच्या सर्वांगीण विकासाठी कटिबद्ध असलेल्या भारतीय जनता पक्षात सहभागी होण्याचा ओघ …

Leave a Reply