Breaking News

पनवेल तालुक्यात विकासाची गंगा

शिवकरमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त
भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्न आणि पाठपुराव्यामुळे मतदारसंघात अनेक विकासाची कामे सातत्याने सुरू आहेत. या अंतर्गत शिवकर ग्रामपंचायतीमध्ये आमदार निधी, महारष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभाग 25/15 आणि ग्रामपंचायत 15व्या वित्त आयोग अंतर्गत रविवारी (दि. 21) विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या कामांसाठी तीन कोटी 24 लाख 73 हजार 68 रुपये मंजूर करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्र सरकार पुरस्कृत जलजीवन मिशनच्या हर घर जल हर घर नल अभियानांतर्गत शिवकर गावात पाण्याची पाईपलाईन टाकणे व नवीन टाकी बांधणे एक कोटी 26 लाख 79 हजार 734 रुपये, नळ पाणीपुरवठा करणे व मुख्य पाईपलाईन ते पाण्याच्या टाकीपर्यंत पाईपलाईन टाकणे 10 लाख रुपये, ग्रामपंचायत हद्दीतील अंतर्गत स्मशानभूमी सुशोभीकरण 15 लाख रुपये, परिसर सुधारणा दोन लाख रुपये, स्मशानभूमी येथे नवीन बोअरवेल व नवीन पाण्याची टाकी बसविणे एक लाख 39 हजार 495 रुपये, नामदेव तुपे ते लक्ष्मण तुपे यांच्या घरापर्यंत रस्ते काँक्रीटीकरण चार लाख, बाळाराम कमलू भगत ते तुकाराम विठ्ठल पाटील घरापर्यंत रस्ता नऊ लाख रुपये, रवी भगत ते प्रकाश धर्म ढवळे यांच्या घरापर्यंत रस्ते काँक्रीटीकरण करणे 10 लाख रुपये, रामदास जानू ढवळे ते हरिश्चंद्र धर्मा ढवळे यांच्या घरापर्यंत रस्ते काँक्रीटीकरण करणे आठ लाख रुपये, अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण करणे या कामासाठी आठ लाख रुपये, सामाजिक सभागृह बांधणे 10 लाख रुपये, ग्रामपंचायत कार्यालय परिसर सुशोभीकरण एक लाख रुपये, कार्यलयातील दुरूस्ती चार लाख 63 हजार 839 रुपये, ग्रामपंचायत वारकरी भवन बांधणे टप्पा 2 कामासाठी दोन लाख रुपये, प्रमोद चौधरी ते धनंजय पाटील यांच्या घरापर्यंत बंदिस्त गटार तयार करणे 10 लाख रुपये, संदीप तुपे ते अनंत ढवळे यांच्या घरापर्यंत बंदिस्त गटार तयार करणे या कामासाठी 2.40 लाख रुपये, अंतर्गत गटार तयार करणे आठ लाख रुपये, बौद्धवाड्या परिसरातील रस्ते काँक्रीटीकरण 15 लाख रुपये, नारायण कांबळे ते बुद्धविहाराकडे जाणारा रास्ता काँक्रीटीकरण 15 लाख रुपये, बौद्धवाड्यातील प्रदीप कांबळे ते नारायण कांबळे यांच्या घरापर्यंत दिवाबत्ती लावणे चार लाख रुपये, मुस्लिम कब्रस्थान संरक्षण भिंत बांधणे 10 लाख रुपये, तलाव सुशोभीकरण 10 लाख रुपये, तलावाला संरक्षण भिंत बांधणे 10 लाख रुपये, ग्रामपंचायत हद्दीतील सर्व विहिरींचा गाळ काढणे व साफसफाई करणे 1.50 लाख रुपये, शिवकर ते मोहो गावाजवळील मोरी ते भगवान फडके मोहो रस्ता तयार करणे नऊ लाख रुपये, ग्रामपंचायत हद्दीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे तीन लाख रुपये या सर्व कामांचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी दत्तात्रेय पाटील, समीर पोपेटा, शंकर महाराज आंग्रे, दादा महाराज, सरपंच आनंद ढवळे, उपसरपंच प्रांजल पाटील, सदस्य रवींद्र ढवळे, मंगेश ढवळे, सदस्या रेश्मा पाटील, संतोष मते, सुरेखा टोपले, मनिषा ढवळे, रितू पाटील, मोनिका पोपेटा यांच्यासह भाजप पळस्पे विभागीय अध्यक्ष अनिश ढवळे, मनोहर ढवळे, हनुमान ढवळे, चंद्रकांत ढवळे, जयदास ढवळे, तुकाराम टोपले, नामदेव तुपे, माया पाटील, चांगदेव ढवळे, गोपाळ पाटील, गोटीराम ढवळे, तुकाराम तुपे, त्रिंबक ढवळे, अंबाजी ढवळे, गोपिनाथ ढवळे, हरिश्चंद्र ढवळे, परशुराम ढवळे, नजिर शेख, जिलानी शेख, जुम्मादीन शेख, खलील शेख, रामदास पाटील, बच्चू ढवळे, अरूण पाटील, जगदीश ढवळे, संदिप ढवळे, राजकुमार ढवळे, सागर ढवळे, पराग ढवळे, अरविंद माळी, अक्षय पाटील, निखिल चोरघे, संतोष ढवळे, बाळ्या ढवळे, अनंता पाटील, राम पवार, नितीन पाटील, दर्शन ढवळे, चेतन ढवळे, समीर पाटील, मच्छिंद्र मते, नितीन ढवळे, अभिषेक पाटील, गणेश भगत, सखाराम चौधरी, दविक ढवळे, आकाश ढवळे, अमेय ढवळे, पुजा ढवळे, किर्ती ढवळे, सुगंधा पोपेटा, अरूणा चौधरी, मिनाक्षी ढवळे, अंजली ढवळे, मनिषा ढवहे, निकिता ढवळे, पुनम पाटील, हर्षदा ढवळे, सोनाली ढवळे, नर्मदा पाटील, रेश्मा पाटील, प्राजक्ता पाटील, प्रिती पाटील, आरती पाटील, संगिता ठाकूर, जनी पाटील, आरती पाटील, प्रदीप ढवळे, तन्मय ढवळे, तुषार टोपले, जयेश ढवळे, सचिन कांबळे, शशांक पाटील, गुरूनाथ पाटील, प्रकाश पाटील, भरत चौधरी, दीपक म्हात्रे, हरेश्वर पाटील, रोहन टापले यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply