Tuesday , February 7 2023

राज्य सरकारविरोधात कर्मचार्यांचा एल्गार!

तहसीलवर एकदिवसीय लाक्षणिक संप

पनवेल : बातमीदार

पनवेल येथील सरकारी कर्मचार्‍यांतर्फे राज्य सरकारविरोधात आपल्या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर एकदिवसीय लाक्षणिक संप पुकारण्यात आला. या वेळी अनेक राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी संपात सहभागी झाले होते. जुनी पेन्शन योजना सर्व कर्मचार्‍यांना लागू करावी, अंशदायी पेन्शन योजना रद्द करावी, कंत्राटी कर्मचार्‍यांच्या सेवा नियमित कराव्यात, केंद्राप्रमाणे सर्व भत्ते कर्मचार्‍यांना लागू करावेत, निवृत्तीचे वय 60 करावे, राज्य शासनाच्या विविध विभागातील खासगीकरण व कंत्राटीकरण धोरण रद्द करण्यात यावे, सर्व संवर्गातील रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावीत, उत्कृष्ट कामासाठी आगाऊ वेतनवाढी दिल्या जात होत्या, त्या पुन्हा सुरू कराव्यात, बेरोजगारी नष्ट करून समान कामाला समान वेतन द्यावे, प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला परिचरांना किमान वेतन 18 हजार रुपये देण्यात यावे, राज्य शासनाच्या विविध विभागातील खासगीकरण व कंत्राटीकरण धोरण रद्द करण्यात यावे, शिक्षण क्षेत्रातील विनाअनुदान धोरण रद्द करावे, हिवताप निर्मूलन योजना जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्यात येऊ नये यांसारख्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांकडे देण्यात आले.

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply