Breaking News

गव्हाण विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण उत्साहात

विद्यार्थ्यांनी अत्युच्च स्थानाचे ध्येय ठेवावे -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल तालुक्यातील गव्हाण कोपर येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज.आ.भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये संस्थेच्या कर्मवीर विद्याप्रबोधिनी संचलित अनिवासी गुरुकुल प्रकल्पांतर्गत वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ सोमवारी (दि.29) उत्साहात झाला. या वेळी अध्यक्षीय भाषणात संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मार्गदर्शन करताना आयुष्यामध्ये अत्युच्च स्थान प्राप्त करण्याचे ध्येय अंगी बाळगावे आणि या विद्यालयातून विविध क्षेत्रांतील उच्चपदस्थ होण्याचा बहुमान प्राप्त करणार्‍या नररत्नांच्या यादीत आपलेही नाव कोरावे, अशा प्रेरणादायी विचारांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली व विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन व रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या समारंभात कला, क्रीडा, वक्तृत्व व शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र आणि गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे या स्नेहसंमेलनातील विविध गीतांचे नृत्य दिग्दर्शन करणारे संगीत विशारद साई मोकल यांचा सत्कार करण्यात आला.
विविध क्षेत्रांत नैपुण्य प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अध्यक्ष भाषणात कौतुक केले. रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य वाय.टी.देशमुख यांचेही औचित्यपूर्ण भाषण झाले.
या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे रायगड विभागीय अधिकारी रोहिदास ठाकूर, विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य अनंताशेठ ठाकूर व विश्वनाथ कोळी, गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच माई भोईर, उपसरपंच विजय घरत, वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, उलवे शाखेचे चेअरमन शरद खारकर, मोरू नारायण म्हात्रे विद्यालय व टी.एन.घरत ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन भार्गव ठाकूर, वसंतशेठ पाटील, सी.एल. ठाकूर, रयत शिक्षण संस्थेच्या नवनियुक्त लाईफ मेंबर व मॅनेजिंग कौन्सिल सदस्य ज्योत्स्ना ठाकूर, ज्येष्ठ नेते जयवंत देशमुख, व्ही.के. ठाकूर, राम मोकल, राजेंद्र देशमुख, रघुनाथ देशमुख, किशोर पाटील, अंकुश ठाकूर, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष नामदेव ठाकूर, गव्हाण ग्रामपंचायतीच्या सदस्य उषा देशमुख, कामिनी कोळी, विधिज्ञ रूपेश म्हात्रे, मदन पाटील, सुधीर ठाकूर, कमलाकर देशमुख,अनुताई म्हात्रे, चिंतामण गोंधळी, किरण म्हात्रे, हेमंत ठाकूर, गव्हाण विद्यालयाचे प्राचार्य गोवर्धन गोडगे, उपमुख्याध्यापक प्रमोद मंडले, रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व जनरल बॉडी सदस्य रवींद्र भोईर, मोरू नारायण म्हात्रे विद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य प्रणिता गोळे, गुरुकुल प्रमुख संदीप भोईर, ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख बाबुलाल पाटोळे आदींसह पंचक्रोशीतील इतर मान्यवर, नागरिक, पालक, विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी विद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने उपस्थित मान्यवर, विद्यार्थी, शिक्षक आणि पालकवर्ग अशा सर्व स्तरातील प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे व मंत्रमुग्ध करणारे वैविध्यपूर्ण आविष्कारांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. यामध्ये नृत्य, नाट्य व गायन अशा विविधरंगी कार्यक्रमांचा समावेश होता.
बक्षीस वितरण समारंभाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य गोडगे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागरकुमार रंधवे व सांस्कृतिक विभाग प्रमुख हर्षला पाटील यांनी केले, तर उपस्थितांचे आभार संस्थेचे लाईफ मेंबर व जनरल बॉडी सदस्य रवींद्र भोईर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख हर्षला पाटील, पारितोषिक वितरण विभागाच्या उज्ज्वला म्हात्रे, चारुशीला ठाकूर, सारिका ठाकूर, योगिता पाटील, नृत्यदिग्दर्शक साईनाथ मोकल, क्रीडा शिक्षक जयराम ठाकूर, कला शिक्षक गणेश भोईर, ज्येष्ठ शिक्षक एकनाथ ठाकूर, देवेंद्र म्हात्रे, वर्गशिक्षक, माध्यमिक व ज्युनिअर कॉलेजचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, स्वयंसेवक आदींनी परिश्रम घेतले.

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply