Breaking News

पनवेलमध्ये प्रधानमंत्री स्वनिधी योजना अंमलबजावणीची सूचना

कर्ज पुरवठ्यासंदर्भात महापालिकेत बँक प्रतिनिधींसोबत बैठक

पनवेल : प्रतिनिधी

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेंतर्गत महापालिकेच्या वतीने पथविक्रेत्यांना भांडवल सहाय्य म्हणून खेळते भांडवल कर्ज स्वरूपात दहा हजार रुपये उपलब्ध करून देण्यात येत आहे. केंद्र शासनाचा व महाराष्ट्र राज्य शासनाचा हा प्राधान्यक्रमाचा विषय असून संबधित बँकांनी प्रधानमंत्री स्वनिधी योजनेंतर्गत अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना सहकार्य करून तत्काळ त्यांची कर्जे मंजूर करावे, अशा सूचना आयुक्त गणेश देशमुख यांनी बँक प्रतिनिधींच्या बैठकीत दिल्या.महापालिकेच्या दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान (डेएनयुलएम) विभागाच्या वतीने सर्व बँक प्रतिनिधींची बैठक मंगळवारी (दि. 29) मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती. या वेळी उपायुक्त कैलास गावडे, दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानाचे व्यवस्थापक विनया म्हात्रे, नवनाथ थोरात, विविध बँकाचे प्रतिनिधी उपस्थित होते. उपायुक्त कैलास गावडे यांनी बँकांकडे पेडिंग असलेल्या केसेसविषयी माहिती देऊन, बँकांनी महापलिकेला सहकार्य करण्याविषयी सूचित केले. ज्या पथविक्रत्यांचे बँकेत खाते नाही त्यांना झिरो बॅलन्सवरती खाते उघडण्यास मदत करावी. संबधित लाभार्थ्यांना सतत बँकेमध्ये हेलपाटे मारण्यास लागू नये याची काळजी घ्यावी, अशा सूचना त्यांनी उपस्थितांना दिल्या. नगरपथविक्रेते अनौपचारिक नागरी अर्थव्यवस्थेचा अत्यंत महत्वाचा घटक आहे. नगरवासीयांच्या आर्थिक कुवतीप्रमाणे स्वस्त दरात वस्तू व सेवांची उपलब्धता सुनिश्चित करण्यात ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. कोविड-19च्या टाळेबंदीमध्ये पथविक्रेत्यांच्या उपजिविकेवर विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे पथविक्रेत्यांच्या व्यवसायास खेळत्या भांडवलांचा पतपुरवठा तातडीने करण्याच्या उद्देशाने केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान स्वनिधी पथविक्रेत्यांसाठी विशेष सुक्ष्म पतपुरवठा सुविधा योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पनवेल महापालिकेच्या वतीने महापालिका क्षेत्रातील पथविक्रेत्यांना कर्ज मिळवून देण्यासाठी सहकार्य केले जात आहे.

Check Also

मुंबईजवळ समुद्रात बोट बुडून 13 जणांचा मृत्यू; 101 जणांना वाचवले

मुंबई : प्रतिनिधी मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी (दि.18) सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. …

Leave a Reply